एक्स्प्लोर

World Costliest Vegetable | सोन्याहून महाग भाजी, जगातील सर्वात महागड्या भाजीची किंमत तब्बल 82 हजार रुपये प्रति किलो!

World Costliest Vegetable : सोन्याहून महाग अशा भाजीचं पीक सध्या बिहारमध्ये घेतलं जात आहे. ही जगातील सर्वात महागडी भाजी आहे. या भाजीची किंमत 82 हजार प्रतिकिलो आहे. जाणून घेऊया या महागड्या भाजीबद्दल...

औरंगाबाद (बिहार) : पावसामुळे शेतीची नुकसान झालं तर बाजारपेठांमध्ये आपोआपच भाज्यांचे दर वाढतात. अशावेळी भाजी खायची की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना कायमच पडतो. पण जर जगातील सर्वात महाग भाजी कोणती आणि तिचा दर काय याची तुम्हाला कल्पना आहे का? अशी एक भाजी आहे जी तब्बल 82 हजार प्रति किलो दराने विकली जाते. किंमत वाचून सुरुवातीला तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसला नसेल. शिवाय या भाजीचे दर ऐकून एवढी महागडी भाजी कोण विकत घेत असेल का असा प्रश्न जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर उत्तर आहे होय.

विशेष म्हणजे बिहारमधल्या औरंगाबादमधील शेतकरी अमरेश कुमार सिंह या भाजीची शेती करत आहेत. खरंतर जेव्हा त्यांनी भाजीची शेती करण्यास सुरुवात केली तेव्हा आजूबाजूच्या लोकांना ही नेमकी कोणती भाजी याची कल्पना नव्हती. अमरेश कुमार यांनी पिकवलेल्या भाजीचं पीक चांगलं आलं तर ते ही भाजी कुठे विकणार? ही भाजी कोण विकत घेणार? अखेर एवढी महाग भाजी कोण खाणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. परंतु या भाजीच्या पिकाबाबत अमरेश अतिशय आशादायी आहेत. तर जाणून घेऊया जगातील महाग भाजीबद्दल...

हॉप शूट्स (Hop Shoots) जगातील सर्वात महाग भाजी हॉप शूट्स (Hop Shoots) असं जगातील सर्वात महागड्या भाजीचं नाव आहे. एक किलो हॉप शूट्सची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 1 हजार युरो म्हणजेच सुमारे 82 हजार रुपये. ही अशी भाजी आहे जी तुम्हाला क्वचितच बाजारात पाहायला मिळेल.

बिहारच्या औरंगाबादमधील अमरेश कुमार सिंह नावाचा शेतकरी जगातील सर्वात महागड्या भाजीचं पीक घेत आहे. करमडीह गावात त्यांची शेती आहे. अमरेश यांच्या मते, वाराणसीतील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेमधील कृषी वैज्ञानिक डॉक्टर लाल यांच्या देखरेखीत 5 गुंठे जमिनीवर प्रायोगिक तत्त्वावर याची शेती केली आहे. दोन महिन्यांपूर्वी या भाजीचं रोप लावलं होतं आणि हळूहळू ते मोठं होत आहे. जसजसं रोपटं वाढतंय तसं अमरेश यांच्या अपेक्षाही वाढत आहेत.

औषध आणि बियर बनवण्यासाठी हॉप शूट्सचा वापर हॉप शूट्स ही भाजी बाजारात उपलब्ध नसते. त्याचा वापर अँटीबॉयोटिक औषधं बनवण्यासाठी केला जातो. टीबीच्या उपचारांमध्ये हॉप शूट्सद्वारे बनवलेलं औषध फायदेशीर ठरतं. या भाजीच्या फुलांचा वापर बियर बनवण्यासाठी केला जातो. या भाजीच्या फुलांना हॉप कोन्स म्हणतात. तर भाजीचे देठ खाल्ल्या जातात. या भाजीचं लोणचंही बनतं, जे फारच महाग असतं.

युरोपियन देशांमध्ये हॉप शूट्सची तुफान मागणी युरोपातील अनेक देशांमध्येमध्ये या भाजीचं पीक घेतलं जातं. ब्रिटन आणि जर्मनीमधील लोकांना ही भाजी फार आवडते. वसंत ऋतु हा हॉप शूट्सच्या शेतीसाठी योग्य समजला जातो. ही भाजी अँटीऑक्सिडेंटचा समृद्ध स्रोत असल्याने त्वचेला चमकदार आणि चिरतरुण ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो.

भारतात संशोधन सुरु भारत सरकार सध्या या भाजीच्या शेतीवर संशोधन करण्यास भर देत आहे. वाराणसीमधील भाजीपाला संशोधन संस्थेत या भाजीच्या शेतीवर फार मोठं काम सुरु आहे. अमरेश कुमार यांनी या भाजीची शेती करण्याच इच्छा व्यक्त केली होती, ती मान्य करण्यात आली. जर त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले तर त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांचंही नशीब फळफळेल.

महत्त्वाच्या बातम्या

ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
PM Modi News : ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 
ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Embed widget