एक्स्प्लोर
होंडा डियोचं नवं मॉडेल, किंमत फक्त...

मुंबई : होंडा मोटरसायकलने भारतात होंडा डियो स्कूटरचं नवं मॉडेल सादर केलं आहे. या स्कूटरची दिल्लीत एक्स शोरुम किंमत 48 हजार 246 रुपये आहे. होंडा डियोच्या नव्या मॉडेलच्या इंजिनमध्ये कंपनीने कोणताही बदल केलेला नाही. यात 10.2 सीसी एअर कूल्ड 4 स्ट्रोक इंजिनचा वापर करण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये होंडा इको टेक्नॉलॉजीचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे मायलेज वाढण्यास मदत होते. होंडाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंह गुलेरिया यांच्या माहितीनुसार हे होंडा डियोचं सहावं मॉडेल आहे. होंडा डियोचं पहिलं मॉडेल 2002 मध्ये लाँच झालं होतं. सध्या या स्कूटर कोलंबिया, मेक्सिको, श्रीलंका आणि नेपाळमध्ये निर्यात केल्या जातात.
Before You Go
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?





















