एक्स्प्लोर

सीमेपलीकडून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी कमी झाली, गृहमंत्रालयाचा दावा

दहशतवादाविरोधात सरकारने उचललेली कडक पावलं आणि झिरो टॉलरन्स धोरणामुळं दहशतवादी हल्ले आणि स्थानीय लोकांचं दहशतवादाकडं झुकण्याचं प्रमाण कमी झालं आहे. तसेच आतापर्यंत 22 टक्के जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

मुंबई : सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या प्रमाणात मोठ्या संख्येने घट झाली असल्याचा दावा गृहमंत्रालयाकडून करण्यात आला आहे. यावर्षी पहिल्या सहा महिन्यात तब्बल 43 टक्क्यांनी घुसखोरीच्या घटना कमी झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवादाविरोधात सरकारने उचललेली कडक पावलं आणि झिरो टॉलरन्स धोरणामुळं दहशतवादी हल्ले आणि स्थानीय लोकांचं दहशतवादाकडं झुकण्याचं प्रमाण कमी झालं आहे. तसेच आतापर्यंत 22 टक्के जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. भारताकडून पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद आणि घुसखोरीविरोधात कडक पावलं उचलल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी मुखिया आणि आयएसआयचे धाबे दणाणले आहेत. पाकिस्तानी दहशतवादी भारतात पकडला गेला किंवा मारला गेला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी तर होते. सोबतच पाकला आर्थिक फटका देखील बसत आहे. तसेच घुसखोरी वाढल्यावर भारताकडून पुन्हा एकदा त्यांच्या भागात घुसून सर्जिकल अथवा एअर स्ट्राईक केला जाऊ शकतो, ही भीती देखील त्यांच्या मनात आहे. पाकिस्तानला स्पष्टपणे असा संदेश गेला आहे की, दहशतवादी घटना घडल्या तर भारत काहीही करू शकतो. दहशतवादी पकडले गेले किंवा मारले गेले तर त्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होते, याचा फटका पाकिस्तानला बसतो. यामुळे सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी घटनांच्या संख्येत यावर्षी मोठी घट झाली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानातून येणाऱ्या एकाही दहशतवाद्याला सोडू नका. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जावे. काश्मीरच्या मुद्दयावर भारत कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अशी आहे आकडेवारी 2016 ते  2018 मध्ये  97 दहशतवादी पकडले तर या काळात या दहशतवाद्यांचे 29 तळ शोधून उध्वस्त केले. 2016 मध्ये 150, 2017 मध्ये  213, 2018 मध्ये 257 तर 2019 मध्ये जून महिन्यापर्यंत  113 दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवादी घटनांमध्ये 28 टक्के तर स्थानिक दहशतवाद्यांच्या भरतीमध्ये 40 टक्क्यांनी घट झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Embed widget