Hindi Diwas 2023: दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस (Hindi Diwas 2023) म्हणून साजरा केला जातो. हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांपैकी एक आहे. पण हिंदीबद्दल (Hindi) बरेच लोक संभ्रमात आहेत, कारण हिंदी ही भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा असल्याने अनेक लोकांना वाटतं की, हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे, परंतु तसं नाही. हिंदीला भारताच्या राष्ट्रभाषेचा दर्जा मिळालेला नाही. यामागचं कारण काय? जाणून घेऊया.


हिंदीबाबत बनला आहे कायदा


स्वातंत्र्यानंतर कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी आणि नरसिंह गोपालस्वामी अय्यंगार या दोघांना भाषेशी संबंधित कायदे बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीमध्ये हिंदी भाषेबाबत बरीच चर्चा झाली. अखेर 14 सप्टेंबर 1949 रोजी कायदा करण्यात आला. घटनेच्या कलम 343 आणि 351 नुसार बनवण्यात आलेल्या या कायद्यात हिंदी ही भारताची अधिकृत भाषा राहील, असं म्हटलं गेलं. तेव्हा तिला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला गेला नाही. तेव्हापासून 14 सप्टेंबरला हिंदी दिन साजरा केला जातो.


संविधानात काय म्हटलं आहे?


हिंदी भाषेचं संवर्धन करून ती पुढे नेणं हे सरकारचं कर्तव्य असेल, असंही संविधान निर्मात्यांनी लिहिलं होतं. याशिवाय हिंदी शब्दकोश आणखी मजबूत करावा, असंही संविधानात सांगण्यात आलं. मात्र, हिंदीबाबत सरकारचा दृष्टिकोन तसा नव्हता.


हिंदी ही देशातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा


कलम 343 नुसार हिंदी ही भारताची अधिकृत भाषा असेल आणि लिपी देवनागरी असेल. हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर सरकारी कामात हिंदी लागू करण्याची पद्धत 15 वर्षं राबवण्यात आली. मात्र, 15 वर्षांनंतर बहुतांश कामं इंग्रजीतूनच होत असल्याचं दिसून आलं. यानंतर भारतातील इतर भाषांनाही राज्यघटनेत मान्यता देण्यात आली. सध्या हिंदी ही देशभरात सर्वाधिक बोलली जाणारी आणि समजली जाणारी भाषा आहे. देशातील 43% पेक्षा जास्त लोक हिंदी भाषा बोलतात.


भारताबाहेर देखील बोलली जाते हिंदी भाषा


भारतात राहणाऱ्या बहुतांश लोकांना वाटतं की हिंदी भाषा फक्त आपल्याच देशात बोलली जाते. पण ही भाषा इतर काही देशांमध्येही बोलली जाते. नेपाळ, फिजी, सिंगापूर, मॉरीशस यासारख्या अनेक ठिकाणी आपण फिरण्यासाठी जातो. या जागा विविधतेने, सौंदर्याने नटलेल्या आहेत आणि दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. मागील अनेक वर्षांपासून येथे राहणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली आहे, त्यामुळे जगभरात देखील हिंदी भाषेचा प्रसार वाढला आहे.


हेही वाचा:


Indian Law: मुलांप्रमाणे मुली करू शकतात का वडिलांच्या संपत्तीवर दावा? वाचा काय सांगतो कायदा...


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI