Himachal Pradesh Snowfall : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे वर्षातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. पर्यटक आणि स्थानिक हंगामातील पहिल्या वर्षवृष्टीची आतुरतेने वाट पाहत होते. शनिवारी सकाळी जाखू टेकडीवर बर्फवृष्टी झाली. रिज मैदान आणि मॉल रोडवरही हलकी बर्फवृष्टी झाली. बर्फाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक रिज मैदानावर पोहोचले. मात्र, हवामान खात्याने शनिवारी आणि रविवारी राज्यात यलो अलर्ट जारी केला होता.


कुफरी, नारकंडासह शिमल्याच्या उंच भागात बर्फवृष्टी झाली. दरम्यान, शिमला शहरात बर्फवृष्टीची लोक आतुरतेने वाट पाहत होते, ती शनिवारी पूर्ण झाली. दुसरीकडे, शिमलाचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ ताज्या हिमवृष्टीनंतर पर्यटकांनी गजबजून गेले होते. येथे मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचले. पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेताना पाहायवा मिळाले. बर्फवृष्टीनंतर पर्यटकांचा ओघ वाढल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली.






 


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारीही हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते. राज्यातील सपाट जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि मध्य आणि उंच पर्वतीय भागात जोरदार हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाकडून स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


शिमला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थिओग-चौपाल रस्ता, नारकंडा भागातील थेओग-रामपूर रस्ता, खारापठार भागातील थेओग-रोहरू रस्ता शनिवारी बर्फवृष्टीमुळे बंद ठेवण्यात आला होता. हा रस्ता दुपारनंतर खुला करण्यात आला.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha