Mukesh Ambani : अमेरिकेमध्ये प्रतिष्ठित स्टोक पार्क विकत घेतल्यानंतर अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने (Reliance) न्यूयॉर्कमध्ये नवीन मालमत्ता खरेदी केली आहे. अंबानी यांनी पंचतारांकित हॉटेल मँडरिन ओरिएंटल न्यूयॉर्क  98.15 दशलक्षमध्ये विकत घेतले आहे. हा करार रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज लिमिटेड (RIIHL) मार्फत केला गेला.


रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने, कोलंबस सेंटर कॉर्पोरेशन (Cayman) चे संपूर्ण जारी केलेले भाग भांडवल, केमन आयलंडमध्ये समाविष्ट केलेली कंपनी आणि मँडरीन ओरिएंटल न्यूयॉर्कमधील 73.37% भागभांडवलांचे अप्रत्यक्ष मालक मिळविण्यासाठी करार केला आहे. मँडरिन हॉटेल न्यूयॉर्क शहरातील प्रीमियम लक्झरी हॉटेल्सपैकी एक आहे.


रिलायन्सने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत दुसरे मोठे हॉटेल विकत घेतले आहे. मँडरिन ओरिएंटल न्यूयॉर्क, न्यूयॉर्क शहरातील प्रीमियम लक्झरी हॉटेल्सपैकी एक, 2003 मध्ये 80 कोलंबस सर्कल येथे, सुंदर सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कलजवळ हे हॉटेल उघडण्यात आले. हे जगभरात प्रसिद्ध आहे असून या हॉटेलला अनेक प्रतिष्ठित सन्मान मिळाले आहेत, ज्यात AAA फाइव्ह डायमंड अवॉर्ड, फोर्ब्स फाईव्ह स्टार हॉटेल आणि फोर्ब्स फाईव्ह स्टार स्पा यांचा समावेश आहे.


महामारीच्या काळात, हॉटेल्सचे उत्पन्न 2020 मध्ये 15 दशलक्ष डॉलर इतके घसरले, जे 2019 मध्ये 113 दशलक्ष डॉलर आणि 2018 मध्ये 115 दशलक्ष डॉलर होते. रिलायन्सने आधीच EIH Ltd (Oberoi Hotels) मध्ये गुंतवणूक केली आहे आणि BKC मुंबईमध्ये एक अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर, हॉटेल आणि व्यवस्थापित घरे बांधत आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha