Winter Skin Care Tips : हिवाळ्यात कोरड्या हवामानामुळे त्वचा कोरडी होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक क्रिम उपलब्ध आहेत. मात्र, अशा क्रीम्समधील केमिकलमुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. अशावेळी तुम्ही नैसर्गिकरित्या त्वचेची काळजी घेऊ शकता. हिवाळ्यात येणार्या भाज्या आणि फळे या दोन्हींचा वापर त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार बनवण्यासाठी करता येतो. टोमॅटो खाण्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया आपण हिवाळ्यात टोमॅटोचा वापर कसा करू शकतो.
टोमॅटो आय मास्क (Tomato Eye Mask) : टोमॅटोच्या सालीमध्ये किती पोषण असते हे तुम्हाला माहिती आहे का? यामध्ये व्हिटॅमिन-सी असते जे त्वचा स्वच्छ करते आणि त्वचेवरील बारीक रेषा कमी करण्यास देखील सक्षम असते. तुम्ही टोमॅटोची साल काही काळ डोळ्यांखाली ठेवू शकता. यामुळे तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यास मदत होईल.
होममेड स्क्रब बनवा (Tomato Scrub) : टोमॅटोचा वापर करून तुम्ही होममेड स्क्रब देखील बनवू शकता. यासाठी तुम्ही टोमॅटो आणि थोडी ब्राऊन शुगर घ्या. टोमॅटोचे कापून दोन भाग करा. त्यात थोडी ब्राऊन शुगर घाला आणि थेट चेहऱ्यावर स्क्रब करा. असे केल्याने तुमची डेड स्किन निघून जाण्यास मदत होते.
सनबर्नसाठी टोमॅटोचा वापर करा (Sunburn) : अनेक लोक हिवाळ्यात सनस्क्रिन न लावण्याची चूक करतात.अशा स्थितीत सनबर्नची समस्या खूप वाढते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही टोमॅटो आणि दह्याचा पॅकही लावू शकता. यासाठी मिक्सरमध्ये टोमॅटो वाटून घ्या आणि त्यात अर्धी वाटी दही घाला.हे मिश्रण चांगले एकजिन करा आणि नंतर चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट सनबर्न झालेल्या भागावर लावल्याने उन्हामुळे झालेली जळजळ बरी होते.
संबंधित बातम्या :
- Health Care Tips : जाणून घ्या हिवाळ्यात 'मध' खाण्याचे फायदे
- Blood Sugar Control: मधुमेह नियंत्रणासाठी या फळांचा आणि पालेभाज्यांचा करा आहारात समावेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha