एक्स्प्लोर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलच्या किन्नौरमध्ये भूस्खलन, सांगला खोऱ्यात पूल कोसळल्याने 9 ठार

हिमाचल प्रदेशच्या सांगला खोऱ्यात पूल कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आणखी वाढू शकते असे बोलले जात आहे.

Himachal Pradesh Landslide: हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये मोठा अपघात झाला आहे. सांगला खोऱ्यात दरड पुलावर कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. किन्नौर जिल्हा एसपी साजू राम राणा यांनी सांगितले की, नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीन जखमी झाले आहेत. या घटनेत बटसेरी पूल कोसळला असून बचाव दल घटनास्थळी हजर असल्याचे एसपीने सांगितले.

सांगला येथे जाणाऱ्या पर्यटकांचे वाहन भूस्खलनाच्या कचाट्यात सापडले. हे पर्यटक छत्तीसगडचे असल्याचे सांगितले जात आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. डोंगरावरुन मोठे दगड घसरत पुलावर आदळले. तिथं सुरू असलेल्या बांधकामांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचीही माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी त्यांच्या मोबाइल कॅमेऱ्यात याचे भयानक दृश्य कैद केलंय.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी ट्वीट केले की, “किन्नौरमधील बटसेरी येथे दरड कोसळल्याने झालेला अपघात हृदयाचा थरकाप उडवणारा आहे. या अपघातात पर्यटकांची गाडी वाहून गेल्याची बातमी आहे, ज्यात 9 जणांचा मृत्यू आणि 2 जण जखमी झालेत. देव दिवंगत झालेल्या आत्म्यास शांती व शोकाकुल कुटुंबाला यातून बाहेर येण्यासाठी शक्त देवो. मी किन्नौर जिल्हा प्रशासनाशी बोललो व अपघाताची माहिती घेतली असून त्यांना योग्य मार्गदर्शन केलंय. प्रशासनाने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले असून बाधित नागरिकांना तातडीने मदत दिली जात आहे. जखमी लवकरात लवकर रिकव्हर व्हावे, अशी मी देवाला प्रार्थना करतो.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरावरुन मोठे दगड घसरत वेगाने खाली असलेल्या पुलावर आदळले. तिथं सुरू असलेल्या बांधकामांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचीही माहिती आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास डोंगरावरून मोठे दगड खाली येऊ लागले. दगड खाली येत असताना बॉम्बचा स्फोट झाल्यासारखा आवाज आला.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Rahul Gandhi: दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Embed widget