IMD Heat Wave Alert:  उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू उष्माघातानं झाले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यामागे दूषित पाणी हे देखील कारण असू शकतं, असं उत्तर प्रदेशच्या एका वरिष्ठ सरकारी डॉक्टरचं मत आहे. लवकरच बलियामधील पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशच्या एकट्या बलिया जिल्ह्यात 54 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे, बिहारची राजधानी पाटण्यामध्ये गेल्या 24  तासांत 35 जणांचा मृत्यू झाला.  


उष्णतेच्या लाट  आणि उष्माघातामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्माघातामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे. सध्य यूपी बिहारसह पूर्ण उत्तर भारतात उष्णतेचा पारा वाढला आहे.भारतीय हवामान विभागाने यूपी आणि बिहारच्या अनेक जिल्ह्यात अलर्ट जारी केला असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


पुढील 24 तास तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा 


हवामान विभागाने  24 तास बिहारच्या बांका, जमुई, जहानाबाद, खगडिया, लखीसराय, नालंदा, नवादा, पटना, समस्तीपूर, शेखपुरामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आरामध्ये उष्णतेमुळे आतापर्यंत 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढती उष्णता आणि उष्माघात यामुळे रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढत आहे  


शाळा 24 जून पर्यंत बंद राहणार


पटनामध्ये गेल्या 24 तासात उष्माघातामुळे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. एनएमसीच रुग्णालयात 19 जणांचा मृत्यू झाला आहे तर पीएमसीएच रुग्णालयात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. बेगसराय, सासारा आणि नवादा येथे प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच भोजपूर आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच या पार्श्वभूमीवर शाळांना देखील सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. पटनातील शाळा 24 जून पर्यंत बंद राहणार आहे. शाळा 19 जून रोजी सुरू होणार होत्या. 


महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा


हवामान विभागाने पुढील 24 तासासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नियमावली जारी केली आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. झारखंड आणि जमेशदपुरामध्ये देखील तापमान 44 अंशावर गेले आहेत. तसेच विदर्भात देखील सध्या उष्णता वाढत आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.


हे ही वाचा :


Weather : विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा