Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather : विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
ज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या बहुतांश भागात उन्हाचा चटका जाणवत आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
पुढील दोन दिवस विदर्भासाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जूनचा दुसरा आठवडा ओलांडला असून मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही.
जूनचा दुसरा आठवडा ओलांडला असून अद्यापही राज्यात मान्सून सक्रिय झालेला नाही.
विदर्भात तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशानी वाढलं आहे. विदर्भातील गोंदिया भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्री मान्सुनचा पाऊस होऊन वातावरणात गारवा निर्माण होऊन तापमान कमी होत असते. पण यंदा तापमान वाढले आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर झाला आहे.
यंदा मान्सून पूर्व पाऊस न झाल्याने वातावरण सरासरीपेक्षा अधिक उष्ण आहे.
बिपरजॅाय चक्रीवादळामुळे मॅान्सूनवर परिणाम झाला आहे.
मृग नक्षत्रामध्ये पेरणीला सुरुवात होत असते, परंतु यावर्षी अजूनही पेरणी योग्य पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत