नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या (स्ट्रेन) संसर्गाबाबत सरकार सतर्क असून घाबरून जाण्याची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या एका वर्षात कोविड -19 ला सामोरे जाण्यासाठी जे महत्वाचे होते त्या सर्व गोष्टी सरकारने केल्या आहेत.


कोरोना विषाणूच्या नव्याने तयार होणाऱ्या संसर्गाविषयीच्या चिंतेच्या प्रश्नाला उत्तर देताना आणि ब्रिटनहून येणाऱ्या उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी करताना ते म्हणाले, की “मी हे सांगू इच्छितो की ही काल्पनिक परिस्थिती आहे, या सर्वांपासून स्वत: ला दूर ठेवा.'' सरकारला सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना आहे. या पत्रकार परिषदेत जी भिती व्यक्त केली जात आहे. तितकं घाबरुन जाण्याची काही गरज नसल्याचे हर्षवर्धन म्हणाले.


ब्रिटनहून येणाऱ्या सर्व फ्लाइट्स त्वरित थांबवा : केजरीवाल



दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला ब्रिटनहून येणाऱ्या सर्व फ्लाइट्स वर त्वरित बंदी घालण्याचे आवाहन केले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन दिसून आल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हे ट्विट केले आहे. हा नवीन स्ट्रेन एक सुपर प्रसारक मानला जातो.


मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्वीट केले की, "ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवीन म्युटेशन आढळले आहे. जे एक सुपर स्प्रेडर आहे. मी केंद्र सरकारला आवाहन करतो की ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व फ्लाइट्स त्वरित बंदी घाला."


यूकेमध्ये, कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन) असलेल्या संक्रमणाचे प्रमाण अचानक वाढले आहे. हे पाहता रविवारपासून कडक बंदोबस्तासह लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. अचानक कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळए बेल्जियम आणि नेदरलँड्सने रविवारी यूकेहून येणाऱ्या सर्व फ्लाइट्स स्थगित केल्या आहेत.


संबंधित बातम्या : 


New COVID-19 strain | जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको, बोरिस जॉन्सन यांचं निमंत्रण रद्द केलं पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण


Coronavirus | ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; भारतीय आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक


प्रतीक्षा संपली.. भारतात जानेवारीमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होणार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे संकेत