एक्स्प्लोर
LIVE : सोलापुरात कुत्र्यांचा धुमाकूळ, 13 जणांना चावा
![LIVE : सोलापुरात कुत्र्यांचा धुमाकूळ, 13 जणांना चावा Headline 702016 LIVE : सोलापुरात कुत्र्यांचा धुमाकूळ, 13 जणांना चावा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/15073000/Aaj-Dinank-Headlines-News-2-580x39512-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हेडलाईन्स
सोलापूर : होटगी रोडवर भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, मंत्री चंडक नगरात 13 जणांना चावा
---------
पतधोरणात कसलाही बदल नाही, रिझर्व बँकेचं पतधोरण जाहीर... रेेपो रेट 6.50% वर कायम... समाधानकारक मान्सून आणि अन्नधान्याच्या किंमती नियंत्रणात आल्यानंतर दरकपातीचा विचार करणार...
---------
राजकारणातून निवृत्त झालोय, समाजसेवेतून नाही - गुरुदास कामत
राजकारणातून संन्यास घेतला म्हणजे सामाजिक कार्यातून निवृत्त झालो असं नाही.. बिगर राजकीय लोकांसाठी मी सदैव उपलब्ध आहे. लोकांना मदत करण्यासाठी मी तयार आहे. माझा राजीनामा व्यक्तिगत कारणांसाठी आहे. मी काँग्रेस पक्ष किंवा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी किंवा उपाध्यक्ष राजीव गांधी यांच्यावर माझी नाराजी नाही - गुरुदास कामत
--------------
1. ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचा राजकारणातून संन्यास, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला धक्का, सोनिया आणि राहुल गांधींना निवृत्तीचं पत्र पाठवलं
2. पुढच्या 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार, हवामान खात्याचं भाकित, महाराष्ट्रातही प्रतीक्षा वाढली
3. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडेंना डावलण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न, भाजप कार्यालयाबाहेर खडसे समर्थकांची निदर्शनं, समर्थकांना राजीनामा न देण्याचं खडसेंचं आवाहन
4. ठाणे विधानपरिषद निवडणुकीत वसंत डावखरेंना धक्का, शिवसेनेचे रवींद्र फाटक मोठ्या मताधिक्याने विजयी, विधानपरिषदेचं उपसभापतीपद रिक्त
5. कुपवाड्यात वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिकांच्या पत्नीचा भीमपराक्रम, पतीचं स्वप्न साकारण्यासाठी स्वाती लष्करात दाखल
6. दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल, राज्याचा निकाल 89.56 टक्के
7. सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्याला दहावीत सर्व विषयात 35 टक्के गुण, न्यू इंग्लिश स्कूलच्या अजय साऴुंखेची जोरदार चर्चा
8. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर, पहाटे दोन वाजता मोदी वॉशिंगटनमध्ये दाखल
9. मराठा आरक्षणासाठी सरकार कटीबध्द, शिवराज्यभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
10. सुशीलकुमारची रिओ ऑलिम्पिक वारी हुकली, नरसिंग यादवच्या नावावरच शिक्कामोर्तब; कुस्ती महासंघाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
राजकारण
बातम्या
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)