एक्स्प्लोर

चारपेक्षा जास्त बँक व्यवहारावर 150 रु. अतिरिक्त शुल्क!

मुंबई: कॅशलेस व्यवहारांना अधिकाधिक चालना देण्यासाठी खासगी बँकांनी बँक व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, 4 पेक्षा जास्त वेळा होणाऱ्या बँक व्यवहारांवर प्रत्येकी 150 रुपयांचं अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. 1 मार्चपासून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार पैसे काढणे आणि पैसे बँकेत भरणे अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहाराचा समावेश आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस या खासगी बँकांमध्ये हे नवीन नियम लागू होणार आहेत. हा नियम 1 मार्चपासून सेव्हिंग आणि सॅलरी अकाउंटवर लागू करण्यात आला आहे. एचडीएफसी बँकेचा नवा नियम (HDFC) एचडीएफसीनं जारी केलेल्या एका पत्रकानुसार, पहिले चार व्यवहार मोफत असतील. मात्र, त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर 150 रु. अतिरिक्त शुल्क असून त्याशिवाय टॅक्स आणि सेसही वसूल केला जाणार आहे. त्याशिवाय थर्ड पार्टी कॅश व्यवहारवर 25,500 रुपयांपर्यंतची सीमा निश्चित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ: समजा, तुम्हाला शंभर रुपये काढायचे असतील तरी तुम्हाला त्याव्यतिरिक्त 150 रुपयांपेक्षा (कर आणि सेससह) जास्त रक्कम फी म्हणून द्यावी लागेल. एचडीएफसीच्या होम ब्रँचमधून दर दिवशी दोन लाखांपर्यंतचे व्यवहार (विड्रॉ किंवा डिपॉझिट) मोफत असतील, त्यानंतर पुढील प्रत्येक एक हजार रुपयांमागे पाच रुपये आकारले जातील. मात्र किमान 150 रुपये आकारले जाणार असल्याचं बँकेने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच 2 लाख 1 हजार रुपये काढले किंवा भरले तरी दीडशे रुपये चार्ज केले जातील. नॉन होम ब्रँचमधून दर दिवशी 25 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार (विड्रॉ किंवा डिपॉझिट) मोफत असतील. त्यानंतर पुढील प्रत्येक एक हजार रुपयांमागे पाच रुपये आकारले जातील. आयसीआयसीआय बँकेचा नवा नियम (ICICI) आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटनुसार, महिन्यातील पहिले चार व्यवहार मोफत असणार आहेत. त्यानंतरच्या व्यवहारावरील  प्रत्येकी हजार रुपयांवर 5 रुपये अतिरिक्त शुल्क असणार आहे. तर थर्ड पार्टी कॅश व्यवहारवर 50,000 रुपयांपर्यंतची सीमा निश्चित करण्यात आली आहे. तसेच बँकेत पैसे जमा करण्यावरही प्रति हजार पाच रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. कॅश मशीनमधून फक्त एकाच वेळेस मोफत रक्कम जमा करता येणार आहे. त्यानंतर येथील व्यवहारावर देखील प्रत्येकी हजार रुपयांवर 5 रुपये शुल्क असणार आहे. अॅक्सिस बँकेचा नवा नियम (Axis) अॅक्सिस बँकेनं पहिले पाच व्यवहारावर किंवा 10 लाख रुपयांपर्यंत बँकेत पैसे जमा करण्यावर कोणतंही शुल्क आकारलेलं नाही. मात्र, पाचव्या व्यवहारानंतर प्रत्येकी 1000 रुपयावर 5 रुपये किंवा 150 रुपये (जे अधिक असतील) शुल्क आकारलं जाईल. एकीकडे खासगी बँकांनी हा नियम लागू केला आहे. पण सरकारी बँकांनी हा नियम लागू केलेला आहे की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, या निर्णयामुळे नोकरदारांमध्ये नाराजी पसरली आहे. संबंधित बातम्या: HDFC चा दणका, ATM मधून पाचव्यांदा पैसे काढताना 150 रुपये फी

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget