नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात पार्टीतील खासदारांचं एक प्रतिनिधिमंडळ शनिवारी दुपारी हाथरस घटनेत पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. पक्षाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसचे अनेक खासदार हथरसमध्ये जाणार आणि पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काँग्रेसचं प्रतिनिधीमंडळ पीडितेच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होणार आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.'





गुरुवारी दुपारी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी ताफा घेऊन निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यात थांबवलं. यावेळी चालत निघालेल्या राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. तसेच काँग्रेसच्या वतीने दावा करण्यात आला की, राहुल गांधी आणि प्रियंका यांना उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी अटक केली होती.





राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. तसेच ते पुन्हा हाथरसला जाणार असल्याची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, 'जगातील कोणतीच शक्ती मला हाथरसच्या दुःखी कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होण्यापासून रोखू शकत नाही.' तसेच राहुल गांधी यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, 'पीडित मुलीबरोबर आणि कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी केलेला व्यवहार मला तर मान्य नाहीच शिवाय कोणत्याही भारतीयांना हा व्यवहार पटला नसेल.'


'डीएम म्हणाले, मुलीचा कोरोनानं मृत्यू झाला असता तर मदतही मिळाली नसती', पीडित परिवाराचा गंभीर आरोप


पीडित परिवाराचे प्रशासनावर गंभीर आरोप


हाथरस घटनेत पीडितेच्या परिवारानं पोलिस आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या परिवारानं म्हटलं आहे की, डीएम यांनी आम्हाला धमकावलं तसंच पोलिसांनी मारहाण देखील केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पीडितेच्या भावानं म्हटलं आहे की, आमचे फोन सर्विलांसवर आहेत. डीएमने आम्हाला धमकी दिली आहे. आम्हाला कुणाशी बोलण्यास बंदी घातली तसंच बाहेर देखील निघू दिलं नाही. पीडितेच्या परिवारानं म्हटलं आहे की, पोलिसांनी आम्हाला सांगायला हवं होतं की, त्यांनी कुणाला जाळलं. कुणाच्या सांगण्यावरुन आमच्या मुलीला जाळलं.


पाहा व्हिडीओ : राहुल आणि प्रियाका गांधी आज हाथरसमध्ये जाण्याची शक्यता



अखेर पीडितेच्या गावात मीडियाला प्रवेश दिला


हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात एबीपी न्यूजच्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. ABP न्यूजच्या मोहिमेनंतर आता पीडितेच्या गावात मीडियाला प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेश दिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एबीपी न्यूज टीम पीडितेच्या घरी पोहोचली. पीडितेच्या भावानं म्हटलं आहे की, आमचे फोन सर्विलांसवर आहेत. डीएमने आम्हाला धमकी दिली आहे. आम्हाला कुणाशी बोलण्यास बंदी घातली तसंच बाहेर देखील निघू दिलं नाही. पीडितेच्या परिवारानं म्हटलं आहे की, पोलिसांनी आम्हाला सांगायला हवं होतं की, त्यांनी कुणाला जाळलं. कुणाच्या सांगण्यावरुन आमच्या मुलीला जाळलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश दिले आहेत की, हाथरसमध्ये मीडियाला जाण्याची परवानगी दिली जावी.


महत्त्वाच्या बातम्या :