हरियाणा : वरातीत उत्साहाच्या भरात गोळीबार झाल्याने नवरदेवाला लग्न मंडपाऐवजी रुग्णालयात जाण्याची वेळ आहे. हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यात ही घटना घडली. या घटनेत नवरदेव जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

काय आहे प्रकरण?

महावीर कॉलनीत राहणाऱ्या कर्मजीत उर्फ अमन सैनीचा विवाह तिथे राहणाऱ्या ममता सैनीसोबत ठरला होता. 28 एप्रिल रोजी सैनी स्कूलमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार होता. इथे खाण्या-पिण्याची लगबग सुरु होते. त्यावेळी व्हा वऱ्हाडी मंडळींपैकी काही जण उत्साहाच्या भरात गोळीबार करत होते. नवरदेव अमन स्कूलच्या गेटवर पोहोचला. वधू पक्ष स्वागताच्या तयारीत होते. पण याचवेळी त्याला गोळी लागली.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे तिथे गोंधळ झाला. या गदारोळात काही जण नवरदेवाला घेऊन रुग्णालयात गेले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, अमन आता धोक्याबाहेर आहे.

दरम्यान पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून गोळी चालवणाऱ्याचा शोध सुरु आहे.