हेडलाईन्स

 

फ्रान्सच्या मॅटियूज रोयरला पराभूत करत भारतीय बॉक्सर विजेंदर सिंगचा सलग पाचवा विजय




मुंबई : कामाठीपुराच्या 14 व्या गल्लीतील तीन मजली इमारत कोसळली, काही जण अडकल्याची शक्यता, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल


----------------------------

पुणे : शिरुरमधील मांडवगण फराटा गावात 4 वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला, 20 फुटांवर अडकलेल्या सुनील मोरेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

----------------------------

नवी दिल्ली : 6 मे रोजी सोनिया गांधींच्या नेतृत्त्वात काँग्रेसचा संसेदवर मोर्चा

----------------------------

नीट प्रवेश परीक्षा 1 मे रोजीच होणार, विद्यार्थ्यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, निर्णय बदलण्यास कोर्टाचा नकार

----------------------------

सोलापुरातील 80 हजार महिला विडी कामगारांचा संप मागे, महिन्यापासून बंद असलेले कारखाने आजपासून सुरु होणार

----------------------------

नागपुरात दुहेरी हत्याकांडाने खळबळ, पडक्या इमारतीजवळ दोन तरुणांचे मृतदेह सापडले, खामला परिसराच्या शिवनगरातील घटना

----------------------------

1. पर्यावरण नियमांचा भंग करुन उभारलेली आदर्श जमीनदोस्त करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश, आदर्शचे सदस्य सुप्रीम कोर्टात जाणार

 

2. सुशीलकुमार नसते तर आदर्शचा घोटाळा झालाच नसता, याचिकाकर्ते वाटेगावकरांचा आरोप, तर आव्हाड स्टार परफॉर्मर असल्याची टीका

 

3. 1 मे रोजी होणारी परीक्षा 'नीट'अंतर्गतच घ्या, केंद्राच्या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार, राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार

 

4. धनंजय आणि पंकजा मुंडेमधला शाब्दिक वाद आता संस्कारांवर, धार्मिक व्यासपीठावर राजकीय आरोप करण्याची गरज नव्हती, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

 

5. ऑगस्टा वेस्टलॅण्डमध्ये कारवाईस यूपीएने मुद्दाम उशीर केला, अमित शाह यांचा सनसनाटी आरोप, लाचखोरी झाल्याचंही वक्तव्य

 

6. 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी नीतिश कुमार योग्य पर्याय ठरतील, शरद पवारांचं मत, दिल्लीत बिगरभाजप पक्षांची बांधाबांध

 

7. अर्थमंत्रालयाकडून पीएफवरील व्याजदारात वाढ, व्याजदर 8.70 टक्क्यांवरुन 8.80 टक्क्यावर, 5 कोटी नोकरदारांना लाभ मिळणार

 

8. निवासी डॉक्टरांना संरक्षणासाठी शस्त्राचे परवाने द्या, मार्डची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कायद्यात सुधारणा करण्याचीही विनंती

 

9. सायना नेहवालची आशिया बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत धडक; भारताच्या फुलराणीची चीनच्या माजी विश्वविजेत्या शिझियान वँगवर मात

 

एबीपी माझा वेब टीम