एक्स्प्लोर

राम रहीमच्या शिक्षेची सुनावणी, हरियाणात शाळा-महाविद्यालये बंद

बाबा राम रहीमवरील बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर हरियाणामध्ये राम रहीमच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. त्यामुळे हरियाणा सरकारने उद्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

नवी दिल्ली : बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यानंतर सीबीआय कोर्ट बाबा गुरमीत राम रहीमला शिक्षा सुनावणार आहे. राम रहीलमा किती शिक्षा होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, बाबा राम रहीमला कमीत कमी 7 वर्षांची आणि जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. राम रहीमवर बलात्कार म्हणजे भा.दं.वि. कलम 376 नुसार आणि धमकावल्याप्रकरणी कलम 506 अंतर्गत आरोप सिद्ध झाला आहे. हे बलात्कार प्रकरण 2002 सालचं आहे. त्यामुळे दिल्लीतील 2013 सालच्या बलात्कार प्रकरणानंतर कडक करण्यात आलेल्या कायद्यानुसार राम रहीमला शिक्षा सुनावली जाणार नाही. मात्र पीडितेवर धर्मगुरुकडून अत्याचार आणि 2 महिलांवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालय 10 वर्षांपर्यंत शिक्षा देऊ शकतं. याशिवाय कलम 506 साठीही 7 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावली जाऊ शकते. न्यायाधीश रोहतक जेलमध्ये जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार आहेत. जेलमधील या न्यायालयाला सत्र न्यायालयाचा दर्जा असल्याने राम रहीमला हायकोर्टात निर्णयाला आव्हान देता येईल. निर्णयाची प्रत लगेचच राम रहीमच्या वकिलाकडे दिली जाईल. यानंतर राम रहीमचे वकील हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकतात. दरम्यान जाणकारांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळणं कठीण मानलं जातं. राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला तरी हायकोर्ट सीबीआयची बाजू ऐकून घेतल्याशिवाय जामीन मंजूर करणार नाही. सीबीआयला नोटीस पाठवून उत्तर मागवलं जाईल. त्यानंतर पुढील सुनावणी होईल म्हणजेच ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत राम रहीमचा मुक्काम तुरुंगात असेल. हिंसाचारानंतर हरियाणा सरकार खडबडून जागं बाबा राम रहीमवरील बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर हरियाणामध्ये राम रहीमच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. त्यामुळे हरियाणा सरकारने उद्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी सेनेच्या 28 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर अनेक ठिकाणच्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अजित डोभाल यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक हरियाणातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही चोख सुरक्षा व्यवस्था असल्याचा दावा केला आहे. इंटरनेट सेवा बंद हरियाणाच्या गृहविभागाने 29 ऑगस्टला सकाळी 11 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट, एसएमएस आणि सर्व वायफाय हॉटस्पॉट बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मोबाईल व्हॉईस कॉलिंगवर याचा काहीही परिणाम होणार नाही.
संबंधित बातम्या राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख? व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात? कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Embed widget