रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करुन पैलवान साक्षी मलिकनं भारताचं पदकाचं खातं उघडलं. साक्षीनं केलेल्या या गौरवास्पद कामगिरीची दखल घेऊन हरियाणा सरकारनं तिला अडीच कोटीचं बक्षीस जाहीर केलं आहे. तसंच सरकारी नोकरी देण्याचीही घोषणा केली आहे.

 

भारताला पहिल्यावहिल्या पदकासाठी ऑलिम्पिक सुरु झाल्यापासून तब्बल 11 दिवस वाट पाहावी लागली. अखेर साक्षीनं प्रतिस्पर्धी खेळाडूला आस्मान दाखवत भारताला रिओत पहिलं पदक मिळवून दिलं.

 

ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतीत पदक जिंकून देणारी साक्षी ही पहिलीच महिला पैलवान ठरली आहे. 23 वर्षीय साक्षीनं 58 किलो वजनी कांस्य पदकाची कमाई केली.

 

संबंधित बातम्या:

 

रिओमध्ये भारताला पहिलंवहिलं पदक, पैलवान साक्षी मलिकला कांस्य

 

साक्षी तू इतिहास रचला, आम्हाला तुझा अभिमान आहे: पंतप्रधान मोदी