हेडलाईन्स


1 रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदकाचं खातं उघडलं, पैलवान साक्षी मलिकची कांस्यपदकाची कमाई, ऑलिम्पिक पदक जिंकणारी साक्षी पहिलीच भारतीय महिला पैलवान

-----------------------

2 कुस्तीनंतर आता बॅडमिंटन एकेरीत भारताच्या पदकाच्या आशा अजूनही कायम, पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरी आज

-----------------------

3 पैलवान नरसिंग यादवच्या ऑलिम्पिकमधल्या सहभागावर आज निकाल, क्रीडा लवादाच्या निर्णयाकडे देशवासियांचं लक्ष्य

-----------------

4 उपजिल्हाधिकाऱ्याला  मारहाण केल्याप्रकरणी आमदार सुरेश लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, एसआरपीएफसह पोलिसांचा फौजफाटा कर्जतमध्ये दाखल

-------------------

5 मुलगा नैराश्यात असतानाही कृषी खात्याच्या सहसचिवांना सुट्टी नाकारली, राजेंद्र घाटगेंच्या मुलाची आत्महत्या, भगवान सहाय यांच्याविरोधात संतापाची लाट

------------------------

6 कृष्ण हा लोण्यासाठी थरांची स्पर्धा करत नव्हता, अटी शिथिल करण्याच्या मागणीला सुप्रीम कोर्टाची फटकार, 18 वर्षाखालील गोविंदांना नो एन्ट्री

-----------------------

7 अर्जुन खोतकरांनी जालना एपीएमसीत 500 कोटीचा घोटाळा केला, आम आदमी पार्टीचा गंभीर आरोप, खोतकरांचा शर्मांना कोर्टात खेचण्याचा इशारा

--------------------------

8 साताऱा हत्याकांडमध्ये दोन जणांना अँम्बुलन्समध्ये इंजेक्शन देऊन मारलं, डॉ. पोळची कबुली, तर वनिताच्या मृतदेह धोम धरणात टाकला

------------------------

9 रिक्षा, टॅक्सीचे परवाने मराठी मुलांनाच द्या, पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचा मराठी राग, राज्याचं अधिवास धोरण जाहीर करण्याचीही मागणी

---------------------

10 सैराटवर बोलून बोलून वैताग आला, पुण्यातील विवेक लघुपट महोत्सवात नागराजचे उद्विग्न उद्रगार, दाभोलकरांना संवेदनशील कलाकारांची आदरांजली

-----------------------

एबीपी माझा वेब टीम