मुंबई : भारतात येत्या चार वर्षांत म्हणजचे 2020 पर्यंत 73 कोटी यूझर्स इंटरनेटचा वापर करत असतील. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नॅसकॉम आणि नेटवर्क सेवा क्षेत्रातील कंपनी आकामाई यांनी यासंदर्भात एक अहवाल जारी केला आहे.

 

जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 2020 पर्यंत 4 अब्ज 73 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यात भारतातील वापरकर्ते 73 कोटींच्या घरात असतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

"इंटरनेटमधील विकासामुळे नवीन व्यवसायांना पोषक वातावरण निर्माण झालं आहे. तसंच या वातावरणाचा उपयोग हॉस्पिटॅलिटी, ई-कॉमर्स सारख्या क्षेत्रामध्ये केला जाणार आहे. ई-कॉमर्सच्या वाढीसाठी याचा वापर करणं आणि येणाऱ्या समस्यांचं निवारण करणं अधिक सुलभ होईल" असं या अहवालामध्ये सांगितलं आहे.