नांदेड: माझ्या मुलाचा मृत्यू झालाच नाही, माध्यमांनी दाखवलेल्या बातम्या साफ खोट्या असल्याचा दावा हरविंदर रिंदाचे वडील चरणसिंग सोहनसिंग संधू यांनी केला आहे. नांदेड येथील मूळ रहिवाशी आणि बब्बर खालसा आ दहशतवादी संघटनेचा दहशतवादी हरविंदर रिंदा याचा पाकिस्तानातील लाहोर येथे ड्रग्सच्या अतिसेवनाने मृत्यू झाल्याच्या बातम्या माध्यमावर झळकल्या होत्या. त्यानंतर त्याच्या वडिलांनी हा दावा केला आहे.


मोस्ट वांटेड असणारा हरविंदरसिंग रिंदा हा पाकिस्तानात लपून बसला होता आणि त्यास नशेचे व्यसन होते व त्यास किडनीचाही आजार होता. ज्यात त्याने नशेचा ओव्हर डोस घेतला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या माध्यमांनी दाखवल्या.


दरम्यान, सदर घटनेत किती सत्यता आहे.यासाठी ABP माझा ची टीम हरविंदर सिंग रिंदा याच्या नांदेड येथील घरी पोहचली. ज्यात रिंदाचे वडील चरणसिंग सोहनसिंग संधू यांनी रिंदाच्या मृत्यूच्या बातमीत काहीही तथ्य नसल्याच म्हटलंय.


पाकिस्तानात हरविंदर सिंग रिंदा याचा मृत्यू झाल्याचा माध्यमावर झळकणाऱ्या बातम्या ह्या साफ खोट्या असून जर तो मयत असेल तर त्याचे फोटो व्हीडिओ आदी का दाखवले जात नाहीत असा सवाल रिंदाचा वडिलांनी उपस्थित केलाय. तर हे सर्व पंजाब सरकारने हे षडयंत्र करून अशा बातम्या पसरवल्याचा त्यांनी आरोप केलाय. दरम्यान माझा मुलगा रिंदा  ड्रग्ज,गांजा, दारू, परस्त्री ह्या गोष्टींना कधीही हात लावला नाहीये.तर अशा खोट्या बातम्या पासरवणाऱ्याना माझ्या समोर आणा असेही रिंदाचा कुटुंबीयांनी म्हटलंय.


तसेच सर्वसामान्य झाडू मारणाऱ्या व्यक्तीकडेही आता मोबाईल उपलब्ध झालाय.ज्यात ज्यांनी कोणी हरविंदर सिंग रिंदाची डेडबॉडी पाहिली,किंवा फोटो पहिला ,व्हीडिओ असेल ते त्यांनी दाखवावे.तर माध्यमावर चालणाऱ्या बातम्यां खोट्या असून ह्या बातम्या जर खऱ्या असत्या तर त्यावर रिंदाचा मृतदेहाचा फोटो, व्हीडिओ दिसला असता.तर नशेतुन त्याचा मृत्यू झाला हे खोटे असून तो तरुण झाला तेव्हा पासून त्याने कधीही व्यसन केलं नाही आणि तो नशेचा तिरस्कार करत असे त्याच्या वडिलांनी म्हटलंय.


कोण आहे हरविंदर सिंह रिंदा?


हरविंदर सिंह रिंदा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असून तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या (ISI) सांगण्यावरून काम करत होता. रिंदा हा पंजाबसह देशात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रोनद्वारे पाकिस्तानातून शस्त्रे पाठवण्यास सुरुवात केली होती. अलीकडील पंजाबमधील अनेक मोठ्या घटनांमध्ये त्याचे नाव पुढे आले होते. खून, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, खंडणी व स्नॅचिंग अशा अनेक गुन्ह्यांमध्ये पंजाब पोलिसांना तो हवा आहे. हरविंदर रिंदा याने अलीकडेच पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर रॉकेट हल्ला घडवून आणला होता. यापूर्वी त्याने नवांशहर, आनंदपूर साहिब आणि काहलवान येथील सीआयए कार्यालयावर आयईडी हल्ले घडवून आणले होते.