Harvinder Singh Rinda: मोस्ट वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा याच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे. भारतातून निसटून पाकिस्तानात गेलेल्या हरविंदर सिंह रिंदा याचा पाकिस्तानातील लाहोरमध्ये मृत्यू झाला आहे. रिंदाचा लाहोरमधील रुग्णालयात मृत्यू झाला. अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.


हरविंदर सिंह रिंदा हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या (ISI) सांगण्यावरून काम करत होता. रिंदा हा पंजाबसह देशात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रोनद्वारे पाकिस्तानातून शस्त्रे पाठवण्यास सुरुवात केली होती. अलीकडे पंजाबमधील अनेक मोठ्या घटनांमध्ये त्याचे नाव पुढे आले होते.

हरविंदर सिंह रिंदा हा पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील रहिवासी होता. तो नंतर राज्यातील नाशिक येथे स्थलांतरित झाला होता. त्यानंतर तो चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात शिकण्यासाठी आला आणि याच दरम्यान रिंदाने गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवले. रिंदावर 50,000 रुपयांचे रोख बक्षीसही होते. पंजाबच्या एका प्रसिद्ध गुंडाशी त्याचे संबंध होते. पंजाबच्या गुप्तचर यंत्रणांनाही त्यातून अनेक सूचना मिळाल्या होत्या. पंजाब पोलिसांनी आपल्या डायरीत हरविंदर सिंह रिंदा हा ए+ लेव्हल गँगस्टर असल्याचं म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरविंदर रिंदा याला किडनीच्या समस्येमुळे गेल्या आठवड्यात शनिवारी रुग्णालयात नेण्यात आले होते. किडनीच्या समस्येमुळे रुग्णालयात असताना रिंदा यांचा अमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला. रुग्णालयामध्ये त्याला इंजेक्शन देण्यात आले, त्यातच त्याचा मृत्यू झाला, असं बोललं जात आहे.


अनेक प्रकरणात मोस्ट वाँटेड होता रिंदा 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरविंदर रिंदा हा मोस्ट वाँटेड दशतवाडी होता. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि महाराष्ट्रात तो कुख्यात गुंड राहिला आहे. खून, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, खंडणी व स्नॅचिंग अशा अनेक गुन्ह्यांमध्ये पंजाब पोलिसांना तो हवा आहे. हरविंदर रिंदा याने अलीकडेच पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर रॉकेट हल्ला घडवून आणला होता. यापूर्वी त्याने नवांशहर, आनंदपूर साहिब आणि काहलवान येथील सीआयए कार्यालयावर आयईडी हल्ले घडवून आणले होते. याशिवाय कर्नालमध्ये काही काळापूर्वी सापडलेल्या बॉम्बमागेही रिंदा याचा हात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


इतर महत्वाची बातमी:


American MP Shri Thanedar Majha Katta: बेळगावते ते मिशिगन, असा आहे अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्री ठाणेकर यांचा प्रेरणादायी प्रवास