Coronavirus Cases in India : देशातील कोरोना (Covid-19) रूग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 492 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. काल हे प्रमाण 556 कोरोना रूग्णांच्या संख्येपर्यंत होतं. त्यामुळे देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावताना दिसतोय. ही एक चांगली बाब आहे. तर, देशभरात एकूण कोरोना रूग्णांची संख्या 4 कोटी 46 लाख 69 हजार 015 वर पोहोचली आहे.
देशातील कोरोना संसर्गात घट
भारतातील कोरोना संसर्गात घट झाली आहे. 2022 च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. दररोज लाखो नवीन कोरोनाबाधितांची प्रकरणं समोर येत होती. मात्र, आता हे प्रमाण एक हजारांच्याही खाली पोहोचलं आहे. कोरोना लसीकरणामुळे कोरोनाचा वेग मंदावला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत भारतात कोविड प्रतिबंधात्मक लसीचे 219.84 कोटी डोस देण्यात आले आहेत.
सक्रिय कोरोना रूग्णांच्या संख्येतही घट
देशात सध्या 6,489 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. काल ही संख्या 6,782 इतकी होती. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 4 कोटी 46 लाख 69 हजार 015 झाली आहे. यामधील चार कोटीहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
चीनमध्ये 24,473 नवे कोरोना रुग्ण
कोरोनाचं उगम स्थान समजलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 24 हजार 473 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता काही शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करत झिरो कोविड धोरणाला लक्ष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :