एक्स्प्लोर
हार्दिक पटेलची दुसरी कथित सेक्स सीडी व्हायरल
गुजरातमध्ये काल हार्दिक पटेलचा कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर, राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. त्यातच आता 24 तासात हार्दिकच्या कथित सेक्सची सीडी समोर आली आहे.

नवी दल्ली/ अहमदाबाद : गुजरातमध्ये काल हार्दिक पटेलचा कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर, राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. त्यातच आता 24 तासात हार्दिकच्या कथित सेक्सची सीडी समोर आली आहे.
या सीडीतील व्हिडीओत पाटीदार नेता हार्दिक पटेल असल्याचा दावा केला जात आहे. त्याच्यासोबत दोन तरुणी असल्याचंही दिसत आहे. यातील एका तरुणीसोबत तो आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. दरम्यान, या व्हिडीओची एबीपी न्यूजने पडताळणी केलेली नाही.
हार्दिक पटेलचा काल संध्याकाळी एक कथित सेक्सचा व्हिडीओ समोर आला होता. ज्यात हार्दिक पटेल एका महिलेसोबत असल्याचा दावा केला जात होता.
हार्दिकची कालची कथित सीडी अश्विन सांकडसरिया यांनी समोर आणली होती. या व्हिडीओतील व्यक्ती ही हार्दिक पटेल असून, त्याच्यासोबत एक महिलाही असल्याचा दावा सांकडसरिया यांनी केला होता. पण हा व्हिडीओ फेक असल्याचं हार्दिक पटेलने सांगितलं होतं.
विशेष म्हणजे, 5 नोव्हेंबरला एबीपी न्यूजशी बोलतानाच हार्दिक पटेलने शंका व्यक्त केली होती की, येत्या काही दिवसात अशाप्रकारची सीडी समोर आणली जाऊ शकते.
दरम्यान, हार्दिकच्या कथित सेक्स सीडी प्रकरणानंतर गुजरातचं राजकारण चांगलच तापलं आहे. या प्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. हार्दिकची कथित सीडी समोर आणणारी व्यक्ती भाजपच्या जवळची असल्याचे म्हटले जात आहे.
हार्दिकची ज्याने सीडी समोर आणली, त्या अश्विन सांकडसरिया या व्यक्तीचा भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे कथित सीडीचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
VIDEO: हार्दिक पटेलचा तरुणीसोबतचा कथित व्हिडीओ
हार्दिकची कथित सीडी समोर आणणारी व्यक्ती भाजपच्या जवळची?
आणखी वाचा























