National Girlfriend Day 2020 : आज फ्रेंडशीप डे अर्थात मित्रता दिवस आहे. पण यासोबत एक दुसरा देखील खास दिवस आहे. तो आहे गर्लफ्रेंडसाठीचा. हो, आज नॅशनल गर्लफ्रेंड डे (National Girlfriend Day 2020) आहे. दर 1 ऑगस्टला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी ज्यांच्या गर्लफ्रेंड्स आहेत, ते लोकं वेळ काढून सेलिब्रेशन करतात. खरंतर दिवसांच्या या मांदियाळीत गर्लफ्रेंड डे सोबत बॉयफ्रेंड डे (Boyfriend Day) देखील साजरा केला जातो. हा दिवस 3 ऑक्टोबर ला साजरा केला जातो.


काय आहे नॅशनल गर्लफ्रेंड डेचा इतिहास

गर्लफ्रेंड डे (National Girlfriend Day) बाबत असं काही लिखित तथ्‍य नाही की पहिल्यांदा हा दिवस कुठे साजरा झाला, कुणी सुरु केला. 2004 साली पहिल्यांदा गर्लफ्रेंड दिवसाचा उल्लेख झाला होता. 2004 मध्ये प्रेम करणाऱ्या काही लोकांनी एकमेकांचं आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला. गेल पल्सने हा दिवस पहिल्यांदा साजरा केल्याचं बोललं जातं. मात्र याचा काही पुरावा नाही.

काही लोकांचं म्हणणं आहे की, लेखिका कॅथलीन लेंग आणि एलिजाबेथ बटरफील्‍ड यांचं पुस्तक 'गर्लफ्रेंड्स गेटावे' ('Girlfriend Gateway') च्या प्रमोशन दरम्यान गर्लफ्रेंड डे साजरा करण्याची सुरुवात झाली. हे पुस्तक 2002 साली प्रकाशित झालं होतं.

कसा साजरा करतात हा दिवस
जर आपल्या आयुष्यात कुणी खास व्यक्ती आहे. जिच्यासोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवू इच्छिता आणि त्या व्यक्तिसाठी काही स्पेशल करण्याची इच्छा आहे. तर त्या व्यक्तिप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस.  या दिवशी आपल्या गर्लफ्रेंडला सरप्राईज द्या. तिच्या खास आठवणींबद्दल लिहा. ज्या व्यक्तिवर आपण प्रेम करतो तिला काही गिफ्ट द्या.