अयोध्या राम मंदिर
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रीडा
निवडणूक
फोटो
राशीभविष्य
वेब स्टोरी
वर वधू
इतर
By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 27 Sep 2020 09:08 AM (IST)
Happy Daughters Day 2020: दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी डॉटर्स डे म्हणजे मुलींचा दिवस साजरा केला जातो. आज 27 सप्टेंबर रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातोय. या दिवशी परिवार आणि समाजात मुलींचा सन्मान केला जातो. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो. मात्र खरंतर असा एका दिवसासाठी सन्मान करायचा का? तर बिलकुल नाही. प्रत्येक दिवस हा मुलीच्या सन्मानाचा असायला हवा. मात्र भारतासारख्या देशात काही काळापूर्वी मुलींना दुय्यम वागणूक दिली जायची, तिचा जन्म नाकारला जायचा. आजही काही ठिकाणी अशा घटना आपल्याला ऐकायला मिळतात. त्यावेळी मुली देखील कुठंच कमी नाहीत, हे सांगण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे.
आज डॉटर्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर Happy Daughters Day 2020 ची धूम सुरु आहे. मुलीसाठी तसंतर आयुष्यातला प्रत्येक दिवस स्पेशल असतो. मुलगी असणं हे भाग्याचं लक्षण मानलं जातं. भारतात अजूनही काही लोकं मुलींना दुय्यम लेखत असतील मात्र मुली आज कुठंही कमी नाहीत. मुलगी म्हणजे चूल आणि मूल ही संकल्पना आज मोठ्या प्रमाणात बदलली आहे. मात्र काही ठिकाणी असे प्रकार आजही सुरुच आहे. यासाठी या दिवसाचं महत्व आहे.
जे लोकं आजही मुलीला कमी लेखतात त्यांना मुली कमजोर नसतात याची जाणीव करुन देण्याचा हा दिवस आहे. मुलगी ते प्रत्येक काम करु शकते जे काम मुलगा करतो. मुलगी शिकेल तर निश्चितच प्रगती करेल. आपण अशी अनेक उदाहरणं पाहतो की मुलांनी आईवडिलांना वाऱ्यावर सोडलं, मात्र तिथं अनेक अशी उदाहरणं पाहायला मिळतात जिथं मुलगी आयुष्यभर आपल्या आईवडिलांचा सांभाळ करते.
आजही जगात अनेक देशांच्या प्रमुखपदी महिला विराजमान आहेत. अनेक महत्वाच्या संस्थांचं प्रतिनिधित्व मुली करत आहेत. भारतात देखील अनेक राज्यांचा कारभार महिलांच्या हाती आहे. देशातील महत्वाची पदं महिला भूषवत आहेत. महत्वाच्या प्रशासनिक पदांवर महिला अत्यंत चांगलं कर्तव्य बजावत आहेत.
त्यामुळं आजही आपण जर मुलींना दुय्यम वागणूक देत असाल, तिला कमजोर लेखत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्या मुलीला तिच्या पायावर उभं राहण्याची संधी द्या. तिच्या पंखांना बळ द्या. ती आपल्यासाठी स्पेशल आहे याची जाणीव तिला करुन द्या.
Indian Post : ट्रम्प यांच्या नवीन नियमाचा भारताला फटका, अमेरिकेकडे जाणारी टपाल सेवा तात्पुरती बंद, भारतीय पोस्टची घोषणा
धरालीनंतर आता थराली; उत्तराखंडमध्ये आभाळ फाटण्याची मालिका सुरुच, 70 ते 80 घरे गाळाने भरली, लष्कराला पाचारण
आमदारावर ईडीची छापेमारी, 12 कोटी कॅश मिळाली, 6 कोटींचे दागिने, गोव्यात पाच कॅसिनोंचा मालक अन् बरंच काही!
Crime News: दारू पार्टीत काकाकडून शिवीगाळ; रागावल्यामुळे पुतण्याने काकाचं भिंतीवर डोकं आपटलं; मग घाबरत वीटेने वार केला अन् मृतदेह बेडमध्ये लपवला
UP News: साहेब! माझ्या बाळाला जिवंत करा, नवजात बाळाची बॉडी पिशवीत घेऊन वडील डीएम ऑफिसमध्ये, आपबिती ऐकून अधिकारीही सुन्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2025 | शनिवार
Akola News : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, पाशा पटेलांच्या वक्तव्यावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया, सरकारी पदावरील व्यक्तीने...
Mumbai Metro : गणेशोत्सवात मुंबईकरांचा प्रवास सोयीस्कर, मुंबई मेट्रो लाईन 2A आणि Line 7 वर गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार; जाणून घ्या टाईमटेबल
टॅरिफमध्ये डबल दंडित केल्यानंतरही अमेरिकेचा भारताला झटका सुरुच; एक चुकीचा यू टर्न अन् थेट व्हिसा थांबवला! डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन आमनेसामने
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात