एक्स्प्लोर

कर्नाटकच्या विजयाचा आनंद, मात्र वाराणसीच्या दुर्घटनेने मन हेलावलं : मोदी

कर्नाटकमध्ये यश मिळवल्यानंतर भाजप मुख्यालयात भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कर्नाटकचा विजय हा असामान्य आणि अभूतपूर्व आहे, असं मोदी म्हणाले. तर वाराणसीतील दुर्घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं.

नवी दिल्ली : कर्नाटकच्या विजयाचा आनंद आहे. मात्र आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसीतील दुर्घटनेचं दुःख आहे. वाराणसीत उड्डाणपुलाचा भाग कोसळून अनेकांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झाले आहेत. याबाबतीत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली असून मदतकार्य सुरु आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कर्नाटकमध्ये यश मिळवल्यानंतर भाजप मुख्यालयात भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कर्नाटकचा विजय हा असामान्य आणि अभूतपूर्व आहे. भाजपची प्रतिमा हिंदी भाषिक राज्यांमधील पक्ष अशी केली गेली. मात्र भाजपने बिगर हिंदी भाषिक राज्यातही विजय मिळवला, असं म्हणत मोदींनी कार्यकर्त्यांचं अभिनंदनही केलं. ''कर्नाटकच्या विजयाचा आनंद आहे. कार्यकर्ता म्हणून, मुख्यमंत्री म्हणून अनेक राज्यांचा दौरा केला. अनेक ठिकाणी भाषेची अडचण झाली. मात्र कर्नाटकच्या जनतेने एवढं प्रेम दिलं, की भाषेची कोणतीही अडचण आली नाही,'' असं म्हणत मोदींनी कर्नाटकच्या जनतेचे आभारही मानले. ''कार्यकर्ता म्हणून काय काम करायचं हे शिकण्यासाठी एखाद्या शाळेत जाण्याची गरज नाही. भाजपाध्यक्षांचा कार्यक्रम पाहूनच ते शिकलं जाऊ शकतं. घामाचा एक सुगंध असतो, त्याच सुगंधाने कमळ फुलवलं जाऊ शकतं,'' असं म्हणत मोदींनी अमित शाहांचंही अभिनंदन केलं. कर्नाटकात भाजप मोठा पक्ष, मात्र सत्तेचा पेच अत्यंत रंगतदार परिस्थितीनंतर कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 जाहीर झाला. कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झालं होतं. यामध्ये भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या होत्या. मात्र तांत्रिक घोळामुळे एका जागेचा निकाल रद्द करण्यात आला. पण पुन्हा त्याबाबतची खातरजमा केल्यानंतर, भाजपने जिंकलेली ही जागा त्यांच्याच पारड्यात पडली. भाजपच्या कर्नाटकातील हुबळी-धारवाडच्या विजयी उमेदवाराचा निकाल रद्दबातल करण्यात आला होता. मतमोजणीनुसार जगदीश शेट्टार हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅटमधील तांत्रिक बिघाडामुळे निवडणूक आयोगानं हा निकाल रद्द करत राखून ठेवला होता. अखेरी मध्यरात्री जगदीश शेट्टार यांनाच विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 104  झालं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
  • भाजप 104
  • काँग्रेस 78
  • जनता दल (सेक्युलर) 38
  • बहुजन समाज पार्टी 1
  • कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
  • अपक्ष 1
संबंधित बातम्या :

कर्नाटक: भाजप आज सत्ता स्थापनेचा दावा करणार

काँग्रेसचे 7, जेडीएसचे 4 आमदार भाजपच्या संपर्कात?

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Embed widget