नवी दिल्ली: देशातील पहिली स्वदेशी रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम-1 (RUDRAM-1) चे भारताने यशस्वी परीक्षण केले. हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30MKI या फायटर विमानातून डागण्यात येऊ शकते. या मिसाईलचा वेग हा 0.6 माक ते 2 माक इतका म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट आहे.
हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र कोणत्याही प्रकारच्या रेडिएशनच्या सिग्नलला पकडू शकते आणि त्याला नष्ट करू शकते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहनी या क्षेपणास्त्रच्या यशस्वी परीक्षणानंतर ट्विट करुन DRDO आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.





हे नव्या पिढीतील स्वदेशी क्षेपणास्त्र DRDO ने बनवले असून त्याची चाचणी बंगालच्या उपसागरातील बालाकोट या स्थानकावरून सकाळी 10.30 वाजता करण्यात आली. या आधी चार दिवसांपूर्वी DRDO ने आणखी एका सबमरिन विरोधी शस्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.
भारतीय हवाई दलासाठी ही महत्वपूर्ण घटना आहे. त्यामुळे भारतीय लढाऊ विमाने आता शत्रूच्या प्रदेशात आत पर्यंत शिरून त्यांच्या हवाई दलाची ठिकाणे परिणामकारकरित्या उध्वस्त करू शकतात.
नविन पिढीतील रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र किंवा NGARM हे सुखोई 30MKI या लढाऊ विमानावर बसवण्यात येणार आहे. हे क्षेपणास्त्र 500 मीटर ते 15 किलोमीटर इतक्या उंचीवरुन डागण्यात येऊ शकते तसेच 250 किलोमीटर अंतरावरील रेडिएशन नष्ट करू शकते.
हवेतून जमीनीवर डागण्यात येणाऱ्या या रडार विरोधी मिसाईलमध्ये अशी साधने बसवण्यात आली आहेत ज्यामुळे अधिक मोठ्या भागातील रेडिएशन पकडू शकते. एकदा हे क्षेपणास्त्र डागल्यानंतरही नंतर त्याचे लक्ष बदलता येवू शकते.
या क्षेपणास्त्राची तुलना अमेरिकेन नौदलातील AGM-88E या क्षेपणास्त्राशी होऊ शकते. त्यामुळे शत्रूने जरी त्यांची रडार व्यवस्था बंद केली तरी हे मिसाईल त्याच्या अपेक्षित लक्षाला नष्ट करू शकते.
या आधी भारताने पाणबुडी विध्वंसक 'सुपरसोनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपीडो' (स्मार्ट) प्रणालीचे सोमवारी ओडिशाच्या तटावरुन यशस्वी परीक्षण केले होते.

संबंधीत बातम्या:


लडाखच्या तणावादरम्यान शीघ्र प्रतिसाद दिल्याबद्दल हवाई दल प्रमुखांनी केली हवाई योद्धांची प्रशंसा


IAF Day 2020 | भारतीय हवाई दलाचा 88वा स्थापना दिवस; वायुदलाच्या चित्तथरारक कसरती


हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या व्हेईकलची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी