Gyanvapi Mosque Survey : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरूच आहे. दोन्ही पक्षांचे स्वतंत्र दावे आणि सर्वेक्षणानंतर आता न्यायालयात आणखी एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आता काशी विश्वनाथ मंदिरातील नंदीसमोरील भिंत तोडली जाणार की नाही? यावर वाराणसी कोर्ट सुनावणी करणार आहे.


मंदिरीतील नंदी चर्चेच्या केंद्रस्थानी
ज्ञानवापी मशीद संकुलातील तलावात शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये विराजमान झालेला नंदी चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ज्याचे तोंड मशिदीच्या तलावाकडे आहे. वाराणसीच्या 3 महिलांनी न्यायालयात अर्ज दाखल करून सर्वेक्षण पुढे नेण्याची मागणी केली. त्याचबरोबर काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये ज्या ठिकाणी नंदी बसला आहे ती जागा पाडून तेथे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.


वजूखाना सील करण्याबाबतही याचिका
याशिवाय तळघरातील एक खोली पूर्णपणे रिकामी करून फेरसर्वेक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच पश्चिमेकडील भिंतीमागील खडी व डेब्रिज हटवून तेथे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे, दुसरी याचिका यूपी प्रशासनाने दाखल केली आहे. वाराणसीच्या जिल्हा सरकारी वकिलांनी म्हणजेच डीजीसी सिव्हिलने दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, वजूखाना सील केल्यामुळे उपासक वजू करू शकत नाहीत. त्याचबरोबर याच्या आत असलेल्या माशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. आता या मुद्यांवर न्यायालय काय मार्गदर्शक तत्त्वे जारी करते, यावर लक्ष ठेवले जाईल.


शिवलिंगाची जागा सुरक्षित ठेवावी


यापूर्वी सुप्रीम कोर्टात ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले. पण सर्वोच्च न्यायालयाने नमाजला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच शिवलिंगाची जागा सुरक्षित ठेवावी, अशा सूचना दिल्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :