गुरुग्राम : लिफ्टमधून एकत्र जाण्याचा अट्टाहास 20 तरुणांच्या अंगलट आला. 25 ते 30 वयोगटातील तब्बल 20 जण गुरुग्राममधील एका मॉलच्या लिफ्टमध्ये अडकले. त्यानंतर लिफ्टची काच फोडून सर्वांची सुटका करण्यात आली.
कॉल सेंटरचे कर्मचारी असलेले 20 जण गुरुग्राममधील साऊथ पॉईंट मॉलमध्ये शनिवारी रात्री उशिरा आले होते.
मॉलमधील लिफ्टची क्षमता कमी असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांना दोन गटात जाण्यास सांगितलं. मात्र एकत्र जाण्याचा सर्वांचा अट्टाहास होता. इतक्या मोठ्या ग्रुपपुढे कर्मचाऱ्यांचं काही चाललं नाही.
लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन तळमजल्याच्या दिशेने जाताना अतिरिक्त वजनामुळे मध्येच अडकली. त्यानंतर मॉल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केलं. अखेर काच फोडून शिडीच्या सहाय्याने सर्वांना खाली उतरवण्यात आलं. लिफ्टमधील काही तरुणी ऑक्सिजनअभावी बेशुद्ध पडण्याच्या स्थितीत होत्या, असंही पोलिसांनी सांगितलं.
एकत्र जाण्याचा अट्टाहास, मॉलच्या लिफ्टमध्ये 20 जण अडकले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2017 12:00 PM (IST)
मॉलमधील लिफ्टची क्षमता कमी असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांना दोन गटात जाण्यास सांगितलं. मात्र एकत्र जाण्याचा सर्वांचा अट्टाहास होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -