नवी दिल्ली : आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आयटी रिटर्न फाईल करण्याची 31 जुलै ही शेवटची मुदत असते. पण करदात्यांचा वाढता ओघ लक्षात घेता, प्रशासनाने ही मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. यासोबतच पॅनशी आधार लिंक करण्यासाठीही 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आयटी रिटर्न कसे भरावे? सोप्या टिप्स!


अर्थ मंत्रालयाच्या वेबसाईटवर (www.incometaxindiaefiling.gov.in) लॉग ऑन करुन पॅनशी आधार लिंक करण्यासाठी अडचणी येत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र आता हे सर्व अडथळे दूर करण्यात आले असल्याचं स्पष्टीकरण अर्थ मंत्रालयाने दिलं आहे. नावातील बदलांमुळे पॅनशी आधार कार्ड लिंक करण्यात अडथळे येत आहेत.

आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?

आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.



वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.

दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.

संबंधित बातम्या :

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली


आयटी रिटर्न कसे भरावे? सोप्या टिप्स!