एक्स्प्लोर

सुंजवाँ कॅम्प हल्ला, दोन जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-पठाणकोट मार्गावर असललेल्या 36 आर्मी ब्रिगेडच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.

जम्मू-काश्मीर : जम्मू-पठाणकोट मार्गावर असललेल्या 36 आर्मी ब्रिगेडच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पहाटे साडेचारपासून सुरु असलेल्या या चकमकीत आतापर्यंत दोन जवान शहीद झाले आहेत. तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. लष्कराचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे. LIVE UPDATE :
  • तिसऱ्या दहशतवाद्याचाही खात्मा, सर्च ऑपरेशन चालूच
  • जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख रउफ असगर या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड
  • भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद, सर्च ऑपरेशन चालूच
  • दहशतवादी हल्ल्यावर लष्कराकडून पहिली प्रतिक्रिया : या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. ज्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.
  • 'सध्या ऑपरेशन सुरु आहे. ऑपरेशन जोवर संपत नाही तोवर काहीही सांगता येणार नाही. आमचं लष्कर आणि सुरक्षा दल मजबुतीने आपलं काम करत आहेत. भारताची मान आम्ही झुकवू देणार नाही. आमच्या शहीद जवानांचा आम्हाला अभिमान आहे.' अशी प्रतिक्रिया गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली
  • वैष्णो देवीमध्येही हायअलर्ट जारी
  • सुंजावा येथील ऑपरेशन लवकरात लवकर संपावं यासाठी उधमपूर आणि सरसवा येथून पॅरा कमांडर्संना पाचारण करण्यात आलं आहे.
  • गेल्या सात तासापासून अतिरेक्यांचा धुमाकूळ सुरुच, अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
  • या संपूर्ण घटनेवर संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाची नजर आहे. तसेच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांशीही बातचीत केली आहे.
  • केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्या प्रकरणी एक मोठी माहिती दिली आहे. हा हल्ला केलेले सर्व दहशतवादी हे पाकिस्तानी आहेत. जवानांनी या दहशतवाद्यांविरोधात आता जोरदार कारवाई सुरु केली आहे.
जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी पहाटेच्या सुमारास ज्युनियर ऑफिसर्स राहत असलेल्या परिसरात घुसले आणि त्यांनी तिथं अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यामुळे लष्करी जवानांच्या कुटुंबांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. आज (शनिवार) पहाटे 4.50 च्या दरम्यान अचानक गोळीबार सुरु झाला. यानंतर पोलिसांनाही अलर्ट जारी करण्यात आला. तसेच लष्कराने या संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. सुंजावा ब्रिगेड परिसर या लष्करी तळामध्ये तब्बल 3 हजार जवान आहेत. सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार थांबल्याचं कळतं आहे. तसंच लष्कराकडून इतर अतिरेक्यांचा शोधही सध्या सुरु आहे. अफजल गुरुला फाशी दिल्याच्या घटनेला 9 फेब्रुवारीला 5 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे असा हल्ला होऊ शकतो याची सूचना गुप्तचर यंत्रणेनं दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
PM Modi Video Row : मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे आक्रमक
मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, निशिकांत दुबे आक्रमक 
Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget