एक्स्प्लोर

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी स्मृती इराणींंचं नाव चर्चेत

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा सोमवारी, 25 डिसेंबरला पार पडणार आहे. हा सोहळा सरदार पटेल स्टेडियम, साबरमती रीव्हरफ्रंट किंवा गांधीनगरच्या महात्मा मंदिरापैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

गांधीनगर : भाजपने गुजरातचा गढ राखल्यानंतर मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता आहे. विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय, कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला अशा दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत आहेत. स्मृती इराणी यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं वृत्त नाकारलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय हेसुद्धा मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जत आहेत. मांडवीय हे सौराष्ट्रातील नेते असून ते पाटीदार समाजातून येतात. गुजरात विधानसभेचे माजी सभापती वजूभाई वाला यांचं नावही चर्चेत आहे. वाला यांनी यापूर्वी गुजरातमध्ये अर्थ, कामगार आणि रोजगार विभागाची जबाबदारी सांभाळली होती. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा सोमवारी, 25 डिसेंबरला पार पडणार आहे. हा सोहळा सरदार पटेल स्टेडियम, साबरमती रीव्हरफ्रंट किंवा गांधीनगरच्या महात्मा मंदिरापैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता आहे. 1995 पासून म्हणजेच सलग 22 वर्ष भाजप गुजरातवर सत्ता करत आहे. 2012 मध्ये 116 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी केवळ 99 जागांवरच समाधान मानावं लागलं. तर काँग्रेसने 80 जागा मिळवल्या. 150 जागा मिळवण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या अमित शाह यांनी गुजरातचा गड राखला असला, तरी मुख्यमंत्रिपदी कोणाला संधी द्यायची, हा पेच आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्य सचिव आणि अन्य अधिकारी सध्या सरदार पटेल स्टेडियमवर पाहणी करण्यासाठी पोहचले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
TMC Candidate List : ममता बॅनर्जींचा धमाका, विधानसभेसाठी एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर
मोठी बातमी : ममता बॅनर्जींचा धमाका, एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर, नंदीग्राममधून स्वत: लढणार नाहीत!
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Embed widget