एक्स्प्लोर

गुजरातचा रणसंग्राम : दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान

दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि हार्दिक पटेलसह अनेक दिग्गजांनी मतदान केलं.

गांधीनगर : गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान पार पडलं. एकूण 68.70 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मध्य आणि उत्तर गुजरातमधील उमेदावारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि हार्दिक पटेलसह अनेक दिग्गजांनी मतदान केलं. 9 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं होतं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मताची टक्केवारी घसरल्याचं त्यावेळी पाहायला मिळालं होतं. 18 डिसेंबरला गुजरातचा निकाल लागणार आहे. दरम्यान त्यापूर्वीच समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीवर दिसत आहे. लाईव्ह अपडेट : - दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची वेळ संपली, 14 जिल्ह्यातील 93 जागांसाठी मतदान संपन्न - गुजरातमध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत 47.40 टक्के मतदान   - गुजरातमध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत ३९ टक्के मतदान   - मतदान केंद्राबाहेरील पंतप्रधान मोदींच्या रोड शोवर काँग्रेसचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार - पंतप्रधान मोदी मतदानासाठी सामान्यांप्रमाणे रांगेत गुजरातचा रणसंग्राम : दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान - थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमतीतील राणिप येथे मतदान करणार  - मतदान करण्यापूर्वी हार्दिक पटेल यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. 'भाजपचा पराभव अटळ आहे. त्यामुळे जनतेनं आपलं मत अहंकाऱ्यांविरोधात देणं गरजेचं आहे. जनतेची ताकद काय आहे ते त्यांना दाखवून द्या.' असं हार्दिक पटेल त्यावेळी म्हणाले. - भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी गुजरातच्या नारंगपुरा येथे मतदान केलं. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवादही साधला. 'मोठ्या उत्साहात मतदान सुरु आहे. मोठ्या प्रमाणात मतदान करा आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा. देशात आणि जगात गुजरातच्या विकास मॉडेलची चर्चा आहे. गुजरातचा हाच चढता आलेख कायम ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा.' असं आवाहन यावेळी अमित शाह यांनी केलं. - माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी देखील मतदान केलं. LIVE : गुजरातचा रणसंग्राम : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांनीही बजावला मतदानाचा हक्क  गुजरातचा रणसंग्राम : दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मतदानाचा हक्क बजावला - 'निवडणुकीनंतर आमच्या मुलावर कारवाई केली जाईल अशी भीती वाटते', हार्दिक पटेलच्या आई-वडिलांची एबीपी माझाकडे प्रतिक्रिया  निवडणूक आयोगाने मतदानासाठी जय्यत तयारीही केली आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ८९ जागांसाठी ९ डिसेंबरला मतदान पार पडलं. यावेळी  सरासरी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली. आज होणाऱ्या मतदानासांठी मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचं आवाहन काँग्रेस आणि भाजपकडून करण्यात आलं आहे. यंदाची ही निवडणूक पक्षकेंद्रीत न होता चेहरा केंद्रीत झालेली पाहायला मिळते आहे. एकीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भाजपसाठी सगळा जोर लावला आहे. तर काँग्रेसच्या विजयासाठी राहुल गांधींनीही यंदा जोरदार प्रयत्न केले आहेत. दुसरीकडे पाटीदार नेते हार्दीक पटेल, ओबीसी नेते अल्पेश ठाकोर आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांचाही प्रभाव यंदाच्या निवडणुकीवर दिसतो आहे. या सगळ्याचा आजच्या मतदानावर काय परिणाम होईल, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. संबंधित बातम्या : राहुल गांधींच्या मुलाखतीने आचारसंहिता भंग, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश गुजरातमध्ये भाजपला धक्का, आकडेवारीच्या आधारे योगेंद्र यादवांचा अंदाज ‘गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल’, राहुल गांधींची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत मोदी रोज चार लाखांचे मशरुम खाल्ल्यामुळे गोरे : अल्पेश ठाकोर गुजरातमध्ये आश्चर्यकारक निकाल दिसेल: राहुल गांधी पोलिसांनी परवानगी नाकारुनही हार्दिक पटेलचा अहमदाबादेत भव्य रोड शो

महत्त्वाच्या बातम्या

अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Embed widget