एक्स्प्लोर

Gujarat Results 2022: सर्व एक्झिट पोल चुकीचे ठरतील, निकालापूर्वीच काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणींचा मोठा दावा 

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी (jignesh mevani) यांनी मोठा दावा केला आहे. गुजरातमध्ये सर्व एक्झिट पोल अपयशी ठरतील असे त्यांनी म्हटलं आहे.

Gujarat Results 2022 : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल (Gujarat Assembly Elections Results) आज जाहीर होणार आहेत. या निकालाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. गुजरातमध्ये भाजप (BJP) सत्ता राखणार की, काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) तिथे चमत्कार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठारणार आहे. मात्र, निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी (jignesh mevani) यांनी मोठा दावा केला आहे. गुजरातमध्ये सर्व एक्झिट पोल चुकीचे ठरतील आणि काँग्रेस सत्ता स्थापन करेल असा मोठा दावा मेवाणी यांनी केला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला 120 जागा मिळतील, असा दावाही मेवाणी यांनी केला आहे.

ही विधानसभा निवडणूक देशाला नवी दिशा देईल

गुजरात राज्यात गेल्या 27 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. यावेळीही एक्झीट पोलनुसार गुजरातमध्ये भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला पुन्हा बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, निकाल लागल्यावर सर्व एक्झिट पोल फेल होतील, असा दावा काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांनी यांनी केला आहे. ही विधानसभा निवडणूक गुजरात आणि देशाला नवी दिशा देईल असे मेवाणी यांनी म्हटलं आहे. राज्यात बदल होणे अत्यंत गरजेचे असल्याचं मेवाणी यांनी  म्हटलं आहे. ही निवडणूक स्वैराचार, बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात असल्याचं मेवाणी यांनी म्हटलं आहे. यावेळी काँग्रेसला गुजरातमध्ये 120 जागा मिळतील असे ते म्हणाले.

मागील निवडणुकीपेक्षा समीकरणे वेगळी 

मागील निवडणुकीत जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर हे तीन नेते एकत्र होते. या तिन्ही नेत्यांनी  भाजपला 99 जागांवर रोखले होते. मात्र, यावेळी समीकरणं वेगळी आहेत. यावेळी हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकूर हे स्वतः भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma Retirement: गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Embed widget