ट्रेंडिंग
कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
मुंबई-ठाण्याला रेड अलर्ट, कोकणात मुसळधार पाऊस सुरू, अनेक गावांचा संपर्क तुटला; राज्यातल्या पावसाची अपडेट काय?
Mumbai Rain News : मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली, अनेक रेल्वे पटऱ्यांवर पाणी साचले
कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला
युवराज सिंगचे वडिल योगराज यांचा BCCI वर पुन्हा खळबळजनक आरोप, म्हणाले, 7 भारतीय खेळाडूंचं करिअर गटारात घातलं!
हाफ चड्डी नको, आम्हाला फुल पॅन्ट द्या; शाळेच्या पहिल्याच दिवशी 3 रीच्या विद्यार्थ्यांची डिमांड, शिक्षक म्हणाले..
आ. बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांकडून अटक
Continues below advertisement
फाईल फोटो
मेहसाणा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सीएम टू पीएम आसूड यात्रा काढणाऱ्या आ. बच्चू कडू यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. वडनगरमध्ये बच्चू कडू आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आमदार बच्चू कडूंची गेल्या 15 दिवसांपासून सीएम टू पीएम आसूड यात्रा सुरु आहे. काल त्यांना महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नंदुरबारच्या नवापूर चेकपोस्टवर आडवलं होतं. त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अडवणुकीचा निषेध केला.
पण आज आ. बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेचे 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी गुजरातमध्ये प्रवेश करुन वडनगरजवळ निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, यावरुन गुजरातमध्ये राजकारण सुरु झालं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अहमद पटेल यांनी गुजरात पोलिसांच्या कारवाईवर टीका केली आहे. अहमद पटेल यांनी ट्विट करुन सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत नसल्याचं म्हणलं आहे.
संबंधित बातम्या
बच्चू कडूंची शेतकरी आसूड यात्रा गुजरात सीमेवर रोखली!
सचिन तेंडुलकरबद्दल बोलताना बच्चू कडूंची जीभ घसरली
हेमामालिनी रोज बंपर दारु पितात, त्यांनी आत्महत्या केली का? : बच्चू कडू
Continues below advertisement