हिरे व्यापाऱ्याकडून तब्बल 125 कर्मचाऱ्यांना अॅक्टिव्हा भेट!
एबीपी माझा वेब टीम | 21 Apr 2017 05:55 PM (IST)
सुरत: सुरत मध्ये बॉसनं कर्मचाऱ्यांच्या कामावर खूश होऊन त्यांना चक्क अॅक्टिव्हा बाइक भेट म्हणून दिली आहे. सुरतमधील एका हिरा व्यापाऱ्यानं तब्बल 125 कर्मचाऱ्यांना बाइक भेट दिली आहे. 2010 मध्ये मालकानं हिऱ्यांचा व्यापार सुरू केला होता. तेव्हापासून कंपनीला जास्तीत जास्त नफा मिळावा यासाठी या कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. याचीच परतफेड म्हणून मालकानं या कर्मचाऱ्यांना अॅक्टिव्हा गिफ्ट केली आहे. दरम्यान, मागील वर्षी सुरतमधील व्यापारी सावजी ढोलकिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून 1260 जणांना कार गिफ्ट दिली होती. तर 400 कर्मचाऱ्यांना घरखरेदी करण्यात मदत केली होती. तर काही दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या झेन इलेक्ट्रिक कंपनीचे संचालक मिलिंद कुलकर्णी आणि राजीव गुजर यांनी आपल्या 12 कर्मचाऱ्यांना गुढीपाड्व्यानिमित्त कार भेट देऊन अनोखी श्रमवंदना दिली होती. संबंधित बातम्या: