एक्स्प्लोर

जामिनावर सुटलेल्या माय-लेकांनी विकासावर बोलू नये : पंतप्रधान मोदी

राहुल गांधींच्या ‘विकास पागल हो गया’ या टीकेला नरेंद्र मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं. ज्या पक्षाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष स्वतः जामिनावर सुटलेत, त्यांनी विकासाची भाषा करु, नये अशा शब्दात मोदींनी सोनिया आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला.

गांधीनगर : राहुल गांधींच्या ‘विकास पागल हो गया’ या टीकेला नरेंद्र मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं. ज्या पक्षाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष स्वतः जामिनावर सुटलेत, त्यांनी विकासाची भाषा करु, नये अशा शब्दात मोदींनी सोनिया आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला. गुजरातमधील गांधीनगरमध्ये भाजपनं आयोजित केलेल्या गुजरात गौरव यात्रेदरम्यान ते बोलत होते. शिवाय, विरोधक 8 नोव्हेंबरला काळा दिवस पाळतील, तर मी काळ्या पैशांपासून देशाला मिळालेली मुक्ती साजरी करेन, असं देखील मोदी म्हणाले. 'जामिनावर सुटलेल्या माय-लेकांनी विकासावर बोलू नये' राहुल गांधी आणि सोनिया गांधींचं नाव न घेता मोदी म्हणाले की, “जे तुरुंगाची हावा खाऊन आले, त्यांच्याशीच हे खांद्याला खांदा लावून उभे राहतात. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जामिनावर माय-लेकराची सुटका झाली. ज्या पक्षाचे प्रमुखच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जामिनावर सुटलेत, असे लोक गुजरातचं काय भलं करणार?” काँग्रेसला नेहमी घराणेशाही टीकवण्याची चिंता पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने नेहमी खुर्चीसाठी अनेक खेळी केल्या. त्यांना आपली घराणेशाही टीकवण्याची नेहमी चिंता असते. त्यांना देशाची काळजी आणि समाजाची काळजी नाही. त्यांच्यासाठी घराणेशाही महत्त्वाची आहे. पण आमच्यासाठी विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळे घराणेशाही आणि विकासाच्या या युद्धात विकासाचाच विजय होईल, याचा मला विश्वास आहे.” नर्मदा प्रकल्प काँग्रेसच्या डोळ्यात खुपतो नर्मदा प्रकल्पावरुनही मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र झोड उठवली. मोदी म्हणाले की, “पंडित नेहरुंनी ज्या नर्मदा प्रकल्पाचं भूमीपूजन केलं, त्याची संकल्पना सरदार पटेलांनी मांडली होती. त्यामुळे ते पूर्ण होण्यासाठी अनेक अडथळे निर्माण केले गेले. म्हणूनच 40 वर्ष हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. पण आता तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, त्यांच्या (काँग्रेसच्या) डोळ्यात हे खुपत आहे.” ...म्हणून अमित शाहांना तुरुंगात पाठवलं सोहराबुद्दीन प्रकरणात अमित शाहांच्या तुरुंगवासावरुन पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं. मोदी म्हणाले की, “जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्याविरोधात अनेक षडयंत्रे रचली गेली. मला तुरुंगात पाठवण्यासाठी अमित शाहांना तुरुंगात पाठवलं. पण आज पाहा, ते कुठं आहेत, आणि आम्ही कुठे आहोत” तसेच काँग्रेसने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवून दाखवावी. जनतेची दिशाभूल करु नये, असं खुलं आव्हान त्यांनी यावेळी दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहोत तर अशी वागणूक, आम्ही काय आतंकवादी आहोत का? अभिजित दीपकेंचा संतप्त सवाल
आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहोत तर अशी वागणूक, आम्ही काय आतंकवादी आहोत का? अभिजित दीपकेंचा संतप्त सवाल
Sanjay Raut on Amit Shah: एकनाथ शिंदे ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', तुम्ही सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झालेत का? केंद्रीय गृहमंत्र्यांच्या 'त्या' विधानाचा संजय राऊतांकडून खरपूस समाचार
एकनाथ शिंदे ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', तुम्ही सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झालेत का? केंद्रीय गृहमंत्र्यांच्या 'त्या' विधानाचा संजय राऊतांकडून खरपूस समाचार
DK Shivakumar Meets Uddhav Thackeray: कर्नाटक सीएम डीके शिवकुमार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, संजय राऊत सुद्धा उपस्थित, नेमकी काय चर्चा झाली?
कर्नाटक सीएम डीके शिवकुमार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, संजय राऊत सुद्धा उपस्थित, नेमकी काय चर्चा झाली?
नेत्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी माझा बळीचा बकरा? खानापूरमधून माझ्या पराभवाचे मुख्य कारण हेच आहे का, तेव्हा संगनमत केलं होतं का?? माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकरांचा थेट सवाल
नेत्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी माझा बळीचा बकरा? खानापूरमधून माझ्या पराभवाचे मुख्य कारण हेच आहे का, तेव्हा संगनमत केलं होतं का?? माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकरांचा थेट सवाल

व्हिडीओ

Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray and Rajool Patil: उद्धव ठाकरेंना भेटून मातोश्रीबाहेर पडताच संजय दिना पाटलांची लेक म्हणाली, 'आमच्या घरात वैयक्तिक निर्णयाची पद्धत, मी उद्धव साहेंबासोबत'
मातोश्रीबाहेर पडताच संजय दिना पाटलांची लेक म्हणाली, 'आमच्या घरात वैयक्तिक निर्णयाची पद्धत, मी उद्धव साहेंबासोबत'
Solapur Crime News: माढ्यात सख्खा भाऊच झाला वैरी! जुन्या कौटुंबिक वादातून भावानं अन् पुतण्याने भावावर केला सपासप वार; नेमकं काय घडलं?
माढ्यात सख्खा भाऊच झाला वैरी! जुन्या कौटुंबिक वादातून भावानं अन् पुतण्याने भावावर केला सपासप वार; नेमकं काय घडलं?
ठाकरेंचा फुटलेला खासदार पहिल्यांदाच मीडियासमोर; नागेश पाटील आष्टीकरांनी सांगितलं शिवसेना सोडण्याचं राज'कारण'
ठाकरेंचा फुटलेला खासदार पहिल्यांदाच मीडियासमोर; नागेश पाटील आष्टीकरांनी सांगितलं शिवसेना सोडण्याचं राज'कारण'
Omraje Nimbalkar : ओमदादा, धाराशिव नाही तर महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची भावना तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहावं, आमदार प्रवीण स्वामी यांची साद  
ओमदादा धाराशिव नाही तर महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची भावना तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहावं : प्रवीण स्वामी
Omraje Nimbalkar: मला रीलस्टार म्हणून हिणवता, मशाल चिन्हावर उभे राहिलेले आमचे लोक कसे पडले? ओमराजे निंबाळकरांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली
मला रीलस्टार म्हणून हिणवता, मशाल चिन्हावर उभे राहिलेले आमचे लोक कसे पडले? ओमराजे निंबाळकरांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली
Bhima River Big Fish: पाऊस न आल्याने भीमा नदीतील पाणी आटलं, महाकाय मासा जाळ्यात सापडला, आकार पाहून डोळे विस्फारले
पाऊस न आल्याने भीमा नदीतील पाणी आटलं, महाकाय मासा जाळ्यात सापडला, आकार पाहून डोळे विस्फारले
Uddhav Thackeray and Rajool Patil: इकडे ओमराजेंनी सस्पेन्स तयार केला, तिकडे संजय दिना पाटलांची लेकही मातोश्रीवर पोहोचली, 'ऑपरेशन टायगर'मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट
इकडे ओमराजेंनी सस्पेन्स तयार केला, तिकडे संजय दिना पाटलांची लेकही मातोश्रीवर पोहोचली, 'ऑपरेशन टायगर'मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट
Multibagger Stock : 193 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक पोहोचला 3234 रुपयांवर, तीन वर्षात 1 लाखांचे बनले 16.75 लाख, गुंतवणूकदार मालामाल
193 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक पोहोचला 3234 रुपयांवर, तीन वर्षात 1 लाखांचे बनले 16.75 लाख
Embed widget