Gujarat News : दारुबंदी असलेल्या गुजरात राज्यात विषारी दारुमुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरातच्या बोटाद शहरातही ही घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारनं एसआयटीची स्थापना केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात गावठी दारु बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या गावठी दारुच्या गुत्त्याला मिथेनॉल पुरवणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे.


 




दारुची बंदी असलेल्या गुजरात राज्यात धक्कादायक घटना घडली आहे. विषारी दारु पिल्यामुळं 25 जमांचा मृत्यू झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार याप्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. बोटाद याठिकाणी ही घटना घडली आहे. मृत व्यक्तिंना देशी दारु दिल्याचे सांगण्यात येत होते, मात्र, ही देशी दारु नसून केमिकल होते. हे केमिकल एका कंपनीतून चोरुन आणल्याची माहिती देखील मिळत आहे. देशी दारु म्हणून हे केमिकल लोकांना देण्यात आलं. यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे.


चोरी केलंलं केमिकल दारु म्हणून विकले गेले, त्यामुळेच ही दुर्घटना झाली असल्याची माहिती मिळत आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतलं आहे. आणकी काही लोकांना ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. अत्यंत भीषण अशी ही घटना आहे. दारुच्या नावाखाली लोकांना केमिकल पाजले गेले आहे. यामागे दुसरं काही कारण आहे, याचा तपास देखील पोलीस करत आहेत.