एक्स्प्लोर
सर्व्हे : मोदींच्या गुजरातचीच जीएसटी आणि नोटाबंदीवर नाराजी
गुजरातमधील 182 विधानसभा मतदारसंघांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाने सर्व्हे केला आहे. यामध्ये गुजरातच्या जनतेचं मत जाणून घेण्यात आलं. गुजरातमधील 182 विधानसभा मतदारसंघांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. 25 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या काळात करण्यात आलेल्या या सर्व्हेत 18 हजार 243 जणांनी सहभाग घेतला. देशभरात सध्या भारतीय अर्थव्यवस्थेवरुन सरकारला विरोधकांनी सळो की पळो केलं आहे. विकासदर घटल्याने सरकारच्या अडचणी गुजरात निवडणुकीच्या तोंडावरच वाढल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील जनतेनेच जीएसटी आणि नोटाबंदीच्या निर्णयावर असमाधान व्यक्त केलं आहे. जीएसटीवर लोक काय म्हणतात?
- 51 टक्के लोक जीएसटीवर असमाधानी
- 38 टक्के लोक जीएसटीवर समाधानी
- 11 टक्के लोकांनी जीएसटीवर मत मांडलं नाही
- हो – 44 टक्के
- नाही – 33 टक्के
- मत नाही – 3 टक्के
संबंधित बातमी : गुजरात सर्व्हे : हार्दिक पटेल काँग्रेससोबत, तरीही भाजप नंबर वन
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















