या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,"अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेने दु:खी झालो आहे. मृतकांच्या परिवाराप्रती संवेदना. या घटनेसंदर्भात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अहमदाबादचे महापौर बिजल पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासनाकडून घटनेतील लोकांना यथासंभव मदत केली जात आहे."
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अहमदाबादमधील नवरंगपुरा परिसरातील श्रेय हॉस्पिटलमध्ये गुरुवारी पहाटे आग लागली. दवाखान्यातील कोविड-19 पॉझिटिव्ह 40 अन्य रुग्णांना वाचवलं आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हॉस्पिटलला लागलेल्या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान या हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात आग लागली होती. तेथे मृत्यूमुखी पडलेले रूग्ण हे कोविड पॉझिटिव्ह होते. दरम्यान 40 रूग्णांना इतरत्र सुरक्षित हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.