नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यानिमित्त देशभरासह जगभरातील राम भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या ऐतिहासिक क्षणाला खास बनवण्यासाठी सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. भारतासह सातासुमद्रापार अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येही या क्षणाला खास बनवले आहे. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवरील स्क्रीन्सवर भगवान रामाचे फोटो आणि राममंदिराचे थ्रीडी फोटो झळकले.


आज अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन सुरु असताना अमेरिकेतील न्यूयॉर्कमधल्या टाईम स्क्वेअरवर श्रीरामाची प्रतिमा झळकणार होती. मात्र काही जणांनी आक्षेप घेतल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र अखेर हे फोटो पाहण्याची संधी भारतीयांना मिळाली.





न्यूयॉर्कमधील भारतीयांची संघटना अमेरिकन इंडिया पब्लिक अफेअर्स कमिटीने राममंदिर भूमीपूजन कार्यक्रमाला खास बनवण्याची तयारी केली होती. टाईम्स स्क्वेअरच्या स्क्रीन भाड्याने घेण्यात आल्या होत्या. यामध्ये एक नॅसडॅक स्क्रीन आणि दुसरी 17 हजार स्क्वेअर फुटांची मोठी स्क्रीन आहे, जी जगप्रसिद्ध आहे.


अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. त्याआधी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मुख्य पूजा पार पडली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित होते. बरोबर 12 वाजून 44 मिनिटे आठ सकंदांपासून 12 वाजून 44 मिनिटे आणि 40 सेकंद हा 32 सेकंदाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं.


संबंधित बातम्या :