PM Modi In Gujarat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या गुजरात दौऱ्याचा (Gujarat Election) आज तिसरा दिवस आहे. आज सुरेंद्रनगर येथील जाहीर सभेत त्यांनी आपल्या खास शैलीत गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री (Madhusudan Mistry) यांच्या वक्तव्यालाही प्रत्युत्तर दिले. मोदी म्हणाले- 'मी फक्त लोकसेवक आहे, माझी लायकी काय?' मिस्त्री यांनी नुकतेच मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. या निवडणुकीत पंतप्रधान मोदींना त्यांची लायकी दाखवतील असेही म्हटले होते.


'तुम्ही माझी लायकी दाखवू नका' काँग्रेसला मोदींचे प्रत्युत्तर
पीएम मोदी म्हणाले, हे काँग्रेसचे लोक म्हणतात की मोदींची लायकी दाखवू. यावर मोदी म्हणाले अहो, तुम्ही राजघराण्यातील आहात, मी सामान्य कुटुंबातील आहे. माझा कोणतीही लायकी नाही. माझी लायकी दाखवू नका, मी एक सेवक आहे, सेवकाला लायकी नाही. तुम्ही मला नीच म्हटले,  खालच्या जातीचे म्हटले. तुम्ही मला मृत्यूचा व्यापारी, गलिच्छ नाल्याचा किडा म्हटले. आणि तुम्ही लायकी दाखवण्याबद्दल बोलत आहात, आम्हाला लायकी नाही. कृपया विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा. विकसित गुजरात करण्यासाठी मैदानात या. लायकी बनवण्याचा खेळ सोडा भाऊ.


राहुल गांधींवर पुन्हा निशाणा
राहुल गांधींचे नाव न घेता, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवली आणि म्हटले की, जे सत्तेतून बाहेर फेकले गेले आहेत, त्यांना यात्रेद्वारे पुनरागमन करायचे आहे. यासोबतच त्यांनी नर्मदा प्रकल्पाच्या मुद्द्याचा पुनरुच्चार करताना म्हटले- 'तीन दशके नर्मदा धरण प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प एका महिलेच्या खांद्यावर ठेवून काँग्रेसचे नेते मिरवताना दिसत आहेत. ते पुढे म्हणाले की, ही निवडणूक नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा पराभव करण्याची निवडणूक आहे.



जनतेची सेवा करण्याची आणखी एक संधी मोदींनी मागितली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सोमनाथनंतर धोराजीत जाहीर सभेला संबोधित केले. त्यांनी जनतेला सेवा करण्याची आणखी एक संधी मागितली. जनता आणि सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गुजरातची कीर्ती जगभर गाजत असल्याचे ते म्हणाले. या भागातील पाणीप्रश्नाचाच विचार केला, तर भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात किती काम झाले? हे स्पष्ट होईल. मोदी पुढे म्हणाले की, सरकार आणि जनता यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गुजरातचे नाव जगभरात गाजत आहे. मोदी म्हणाले की, गुजरातमध्ये आधी सायकलही बनवली जात नव्हती, तिथे आता विमान बनवायला सुरुवात झाली आहे. राहुल गांधींवर निशाणा साधताना म्हणाले की, काही नेते देशात फिरत आहेत. राजकोटमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी त्यांनी काय केले? हे जनतेने त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारावे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत पहिल्यांदाच उतरणार राहुल गांधी, 'भारत जोडो'च्या विश्रांतीमध्ये घेणार दोन सभा