Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घटताना दिसत आहे. नवीन रुग्णांची संख्या 500 हून कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 406 नवीन कोरोना विषाणू संसर्गाची नोंद झाली असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 492 रूग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावताना दिसतोय. ही एक चांगली बाब आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाचा संसर्घ झालेल्या एकूण कोरोना रूग्णांची संख्या 4 कोटी 46 लाख 69 हजार 421 वर पोहोचली आहे. त्यापैका 5 लाख 30 हजारांहून अधिक रुग्णांचा कोराना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.


कोरोनासोबत इतर साथीच्या रोगांचा प्रसार


एकीकडे देशातील कोरोनाचा वेग मंदावला असला, तरी धोका कायम आहे. त्यातच दुसऱ्या विषाणूजन्य आणि साथीच्या आजारांचा धोकाही वाढताना दिसत आहे. मुंबईसह देशभरात गोवर आजाराचं प्रमाण वाढताना दिसत आहे. लहान मुलांसह प्रौढांनाही गोवरची लागण झाली आहे. त्यासोबतच हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप आणि फ्लूची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे.






देशातील कोरोना उपचाराधीन रुग्ण घटले


देशातील कोरोना उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे. देशात सध्या 6,402  सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. काल ही संख्या 6,782 इतकी होती. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 4 कोटी 46 लाख 69 हजार 421 झाली आहे. यामधील चार कोटीहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशव्यापी कोरोना लसीकरण ( Coronavirus Vaccination ) आतापर्यंत भारतात कोविड प्रतिबंधात्मक लसीचे 219.84 कोटी डोस देण्यात आले आहेत. यामुळे कोरोनाचा वेग कमी होण्यास मदत झाली आहे.


चीनमध्ये सहा महिन्यानंतर कोरोनाचा पहिला बळी


चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये सहा महिन्यानंतर कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. राजधानी बीजिंगमध्ये आका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. शाळा आणि हॉटेल-रेस्टॉरंटही बंद करण्यात आले आहेत. बीजिंगमध्ये रविवारी 516 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.