Gujarat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. पंरतु, गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील तीन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय. राज्य सरकार पाणीटंचाईसह त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या तिन्ही गावांनी केलाय. खेरालू तालुक्यातील वरेठा, डाळीसणा आणि डावोल गावातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातलाय. पाण्याची मागणी पूर्ण न झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून ही तिन्ही गावे कोणत्याच निवडणुकीत मतदान करत नाहीत.  
 
गुजरातच्या उत्तर आणि मध्य भागातील 14 जिल्ह्यांतील 93 मतदारसंघांमध्ये दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान झाले. राज्यातील 182 जागांपैकी 89 जागांसाठी 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते. तर दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान झाले.

  


मतदानावर बहिष्कार घातलेल्या तीन गावांतील रहिवाशांनी यापूर्वी तालुका, जिल्हा आणि ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले नव्हते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अनेकवेळा  निवेदन देऊनेही आपल्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. नर्मदा नदीतील पाणी पाइपलाइनद्वारे तीन गावांतील सर्व जलाशये भरून धरणातून शेतीसाठी सोडावे, अशी मागणी या गावांची आहे.  


सोमवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत झालेल्या मतदानादरम्यान वरेठा, दालिसाना आणि दावोल गावातील सुमारे 5,200 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यापासून दूर राहिले. जिल्हादंडाधिकारी उदित अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने ग्रामस्थांची प्रमुख मागणी आधीच मान्य करूनही ते मतदान न करण्यावर ठाम राहिले. निवडणूक बहिष्काराचे हे तिसरे वर्ष आहे. मी काही महिन्यांपूर्वी या गावांना भेट दिली आणि त्यांना मतदान करण्यासाठी आवाहन केले." 


गुजरातमधील बरियाफ गावातील नागरिकांनी देखील मतदानावर बहिष्कार टाकला होता. परंतु, प्रशासनाच्या प्रयत्नानंतर दुपारी या गावाने आपला निर्णय मागे घेतला आणि मतदानाचा हक्क बजावला. या गावात 50 टक्के मतदान झाले, अशी माहिती अदित अग्रवाल यांनी दिली.  


8 डिसेंबर रोजी मतमोजणी
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. 182 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी आज मतदान झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  


महत्वाच्या बातम्या


मतदानाला जाताना रोड शो, काँग्रेसची पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार