Gujarat Himachal Pradesh ABP C voter Exit Poll Result Live : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात तर गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळं आता या दोन्ही राज्यात सत्ता कुणाची येणार? यावर चर्चा सुरु झाली आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले होते तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं.  हिमाचलमध्येही 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झालं होतं. आज एबीपी माझावर रात्री आठ वाजता हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यांचा एक्झिट पोल दाखवला जाणार आहे.  एबीपी माझा एक जबाबदार चॅनेल आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आम्ही पहिला एक्झिट पोल डेटा रात्री आठ वाजता दाखवला जाणार आहे. हा पोल आपण एबीपी माझा टीव्हीसह एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल तसेच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवला जाणार आहे. 


एक्झिट पोल पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक कराल...


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात एकूण 63 टक्के मतदान झालं होतं. तर दुसऱ्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान झाले. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानादरम्यान 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दोन्ही राज्यांचे निवडणूक निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.


गुजरातबद्दल सांगायचं झालं तर राज्यात गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. 2017 च्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसदरम्यान अनेकदा लढत झाली आहे, मात्र यावेळी आम आदमी पक्षानेही गुजरातमध्ये जोरदार एन्ट्री करत जोर लावला आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये अनेक सभा घेतल्या आणि लोकांना मोफत वीज, मोफत शिक्षण अशी अनेक आश्वासनं दिली आहेत. 


हिमाचल प्रदेशाबाबत बोलायचे झाले तर तिथंही सध्या भाजपचे सरकार आहे. हिमाचलमध्ये राज्यात दर पाच वर्षांनी सरकार बदलत राहतं.  हिमाचल विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपने 68 पैकी 44 जागा जिंकून बहुमताने सरकार स्थापन केले. काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. गुजरातप्रमाणेच हिमाचलमध्येही भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत आहे.