Gujarat Assembly Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलीय. गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. यावेळी अहमदाबादमध्ये मतदानाला जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोड शो करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आलीय. काँग्रेस नेते योगेश रवाणी यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे. मात्र, निवडणूक आचारसंहितेचा कोणताही भंग झाला नसल्याचे भाजपने म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी मतदारांना फक्त मतदान करण्याचे आवाहन केले. कोणी नियमांचे सर्वात जास्त पालन करत असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत, असे भाजपने म्हटले आहे.
"भाजपचा झेंडा घेऊन आणि भगवा स्कार्फ परिधान केलेले मोदी राणीप येथील मतदान केंद्रापासून 500 ते 600 मीटर अंतरावर उतरले आणि आजूबाजूला जमलेल्या लोकांसोबत फिरले, असे योगेश रवाणी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याचे म्हटले आहे. "पंतप्रदान मोदी मतदान करण्यासाठी बाहेर पडतात त्यावेळी ते जवळपास दोन तास रोड शो करतात. परंतु, निवडणूक आयोग कोणतीच कारवाई करत नाही. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. परंतु, ते काहीच काहवाई करू शकणार नाहीत. कारण ते दबावाखाली असून तो घाबरलेला आहे. त्यामुळे आम्ही याबाबत कायदेशील लढाई लढू, असे पवन खेडा यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते जगदीश ठाकूर यांनी देखील पंतप्रधान मोदी आणि भाजपवर यावरून टीका केलीय. गुजरातमध्ये भाजपची सत्ता जात आहे. त्यामुळे मतदानाऐवजी ते प्रचारात गुंतले आहेत. गुरजातमध्ये मतदान असल्यामुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थित रोड शो करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. नरेंद्र मोदी यांनी रोड शो करून आचारसंहितेचा भंग केलाय, असा आरोप जगदीश ठाकूर यांनी केलाय.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं असून जवळपास 59 टक्के मतदानाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 182 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी आज मतदान झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर रोजी पार पडलं होतं. पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 विधानसभा मतदारसंघासाठी 63 टक्के मतदान झालं होतं. आता 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut : निवडणूक यंत्रणेवर विश्वास नाही अशी लोकांची भावना, गुजरातमध्ये भाजपच्या प्रचारावर संजय राऊतांचा हल्लाबोल