Gujarat BJP Candidates 2022 List : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गुजरात विधानसभेच्या 182 जागांपैकी भाजपनं 160 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये फक्त 14 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा यांच्या नावाचा समावेश आहे. रिवाबा जाडेजा यांना जामनगर उत्तर मधून तिकीट देण्यात आलं आहे. 


गुजरात भाजपनं 160 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये फक्त 14 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय अनुसूचित जातीमधील 13 उमेदवारांना तर अनुसूचित जमातीच्या 24 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. 160 उमेदवारांमध्ये फक्त 14 महिला उमेदवारांचा समावेश आहे.  


कोण आहेत 14 महिला? ज्यांना भाजपनं उमेदवारी दिली
 गांधीधाम - मालतीबेन किशोरभाई महेश्वरी
वढवाण - जिग्नबेन संजयभाई पंड्या
राजकोट  पश्चिम- दर्शिता पारस शाह
राजकोट ग्रामीण- भानुबेन मनोहरभाई बाबरिया
गोंडल- गीताबा जयराजसिंह जाड़ेजा
जामनगर उत्तर- रिवाबा रविंद्रसिंह जाडेजा
नांदोद- दर्शनाबेन देशमुख 
लिंबायत- संगीताबेन पाटील
बायड- भीखीबेन गिरवंतसिंह परमार
नरोडा- पायलबेन मनोजकुमार कुकराणी
ठक्करबापा नगर- कंचनबेन विनुभाई रादडिया 
असारवा- दर्शनाबेन वाघेला 
मोरवा हडफ- निमिशाबेन मनहरसिंह सुथार 
वडोदरा शहर- मनीषाबेन राजीवभाई वकील 


38 नव्या चेहऱ्यांना संधी -
गुजरात उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजपनं 38 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहे. तर 69 जणांना पुन्हा संधी दिली आहे. म्हणजेच पहिल्या यादीमध्ये भाजपनं 38 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.  


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक
गुजरातमध्ये एक डिसेंबर आणि पाच डिसेंबर अशी दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने बुधवारी पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये उमदेरांची यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा आहे.


दोन टप्प्यात मतदान - 
गुजरातमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यांत 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत 93 जागांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच, 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, भाजपसाठी दोन्ही विधानसभा निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत.  


आणखी वाचा : Gujarat BJP Candidate List 2022 : भाजपची पहिली यादी जाहीर! हार्दिक पटेल, रवींद्र जाडेजाच्या पत्नीला तिकीट