Gujarat ATS-Coast Guard Action Against Drug Trafficking  : तटरक्षक दलाने सोमवारी गुजरातच्या समुद्राजवळ एक इराणहून आलेली बोट पकडली. या बोटीवरील 5 जणांकडून जवळपास 61 किलोचे ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले आहेत. या अंमली पदार्थांची किंमत ही 425 कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यातय येत आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.


गुजरातजवळ खोल समुद्रात ही कारवाई करण्यात आली असून दहशतवादविरोधी पथकाला मिळालेल्या सुचनेच्या आधारे तटरक्षक दलाने ही कारवाई केली आहे.  


गुजरात एटीएस (ATS) आणि भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) यांनी एकत्र अभियान चालवत समुद्र मार्गे भारतात येणारं कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 61 किलो ड्रग्स इराणी नावेतून जप्त करण्यात आले आहे. याची किंमत 425 कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
 


गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना समुद्रामार्गे भारतात ड्रग्ज येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, एटीएस आणि तटरक्षक दल यांनी एकत्र येत कारवाई केली. या कारवाईसाठी दोन तटरक्षक बोटींचा वापर करण्यात आला होता. पोलिसांच हे गुप्त ऑपरेशन सुरु झालं तेव्हा ड्रग्स घेऊन येणारी बोट ओखापासून 180 सागरी मैल दूर होती. नियोजनबद्ध कामगिरी करत या बोटीवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पाच विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. 



आणखी वाचा :


Kushboo Sundar On Her Father: 'मी आठ वर्षांची असताना वडील माझ्यासोबत...', खुशबू सुंदर यांनी केला धक्कादायक खुलासा