Kushboo Sundar On Her Father: अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केलेल्या खुशबू सुंदर (Kushboo Sundar) यांची नुकतीच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक झाली आहे. नेहमीच आपल्या वैक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असलेल्या खुशबू यांनी आता एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी आपल्या वडिलांवर गंभीर आरोप केला आहे. स्वतःच्या वडिलांवर आरोप करताना खुशबू म्हणाल्या आहेत की, त्या 8 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांनी त्यांचे लैंगिक आणि शारीरिक शोषण केले.
Kushboo Sundar On Her Father: 'वडिलांनी वयाच्या 8 व्या वर्षी शिवीगाळ सुरू केली'
मोजो स्टोरीसाठी बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, "मला वाटतं जेव्हा एखाद्या मुलावर अत्याचार होतो, तेव्हा त्या मुलाच्या मनात आयुष्यभरासाठी भीती बसते. मग तो मुलगा असतो की मुलगी. माझ्या आईलाही खूप त्रास सहन करावा लागला. बायकोला मारहाण करणे, मुलांना मारहाण करणे, एकुलत्या एक मुलीवर लैंगिक अत्याचार करणे हा त्यांचा (वडिलांचा) जन्मसिद्ध हक्क आहे, असे त्यांना वाटले असावे. माझ्यावर अत्याचार झाला तेव्हा मी फक्त 8 वर्षाची होते. मी 15 वर्षांची असताना मला त्याविरुद्ध बोलण्याचे धाडस आले.''
Kushboo Sundar On Her Father: वयाच्या 15 व्या वर्षी वडिलांविरुद्ध बंड
त्या म्हणाला की, ''एक वेळ आली जेव्हा त्याला याविरुद्ध भूमिका घ्यावी लागली. आपल्या कुटुंबियांना ही गोष्ट कळाली तर ते माझ्यासोबत गैरवर्तन करतील या भीतीने मी वर्षानुवर्षे तोंड बंद ठेवले.'' वी द वुमन इव्हेंटमध्ये त्या म्हणाल्या की, "मला नेहमी भीती वाटायची की, माझी आई कदाचित माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण काहीही झाले तरी, माझा पती देव आहे, अशी तिची मानसिकता असल्याचं मी पाहिलं आहे. पण वयाच्या 15 व्या वर्षी मला वाटले की पुरे झाले आणि मी त्यांच्या विरुद्ध बंड करू लागलो. माझा वय 16 वर्षहे नव्हतं तेव्हा त्यानी आम्हाला सोडलं. तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं. त्यावेळी जेवणासाठी पैसे कुठून येतील हेही आम्हाला माहीत नव्हतं.
Kushboo Sundar On Her Father: 'द बर्निंग ट्रेन'मधून केली करिअरची सुरुवात
खुशबू यांनी पुढे सांगितले की, त्यांचे बालपण खडतर होते, पण अखेरीस त्यांनी सर्व अडचणींना धैर्याने तोंड दिले. दरम्यान, 'द बर्निंग ट्रेन' या बॉलिवूड चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. त्यांनी 2010 मध्ये राजकारणात प्रवेश केला.